Offensive writing : छत्रपती संभाजी महाराजाबद्दल इंस्टाग्रॉमवर आक्षेपार्ह लिखाण; आरोपीला अटक

Bhairav Diwase


चंद्रपूर:- दिनांक ७ मार्च २०२५ रोजी पोलीस स्टेशन चिमुर हद्दीत सोशल मिडीया इंस्टाग्रॉम अकॉऊंट वर छत्रपती संभाजी महाराज यांच्या बद्दल आक्षेपार्ह विधान करुन हिन्दु धर्मीयांच्या धार्मिक भावना दुखावतील अशी चॅटींग केली होती.


सदर चॅटची स्क्रीनशॉट ही सोशल मिडीयावर वायरल झाल्यावरुन चिमुर पोलीस स्टेशन येथे लोकांनी सदर इंस्टाग्राम अकॉऊन्ट वापरणारे आरोपीवर कारवाई करणे करीता पो.स्टे. चिमुर येथे तक्रार केल्याने फिर्यादीचे रिपोर्ट वरुन संबंधीत आरोपीविरुध्द पोलीस ठाणे चिमुर येथे अपराध क्रमांक ८८/२०२५ कलम १९६, २९९ भारतीय न्याय संहिता-२०२३ सहकलम ६६ (सी) माहिती व तंत्रज्ञान कायद्यान्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे. सदर गुन्हयातील आरोपीला अटक करण्यात आली असुन गुन्ह्याचा पुढील तपास चिमुर पोलीस आणि सायबर पोलीस करीत आहे.

पोलीस अधीक्षक चंद्रपूर श्री मुम्मका सुदर्शन यांनी याद्वारे सर्व नागरीकांना आवाहन करण्यात येते की, कोणीही सोशल मिडीया वर धार्मिक / जातीय /आक्षेपार्ह पोष्ट करुन सामाजिक शांतता भंग करु नयेत, अन्यथा संबंधीतांविरुध्द कायदेशीर कारवाई करण्यात येईल. सोशल मिडीयावर धार्मिक / जातीय भावना दुखावतील असे मजकुर /फोटो / व्हिडीओ ईत्यादी तयार करणे / पोष्ट करणे / लाईक करणे / शेअर करणे /कॅमेन्टस् करणे / फॉरवर्ड करणे / प्रसारीत करणे हा दखलपात्र गुन्हा आहे.