Crime News: महिलादिनी पोलिस कर्मचाऱ्याने केला महिलेवर अत्याचार

Bhairav Diwase


बीड:- एकीकडे जगभरात महिला दिन उत्साहात साजरा करत असताना बीडमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. महिला दिनाच्या दिवशीच बीडमध्ये पोलीस कर्मचाऱ्यांनी अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. यामुळे बीड पोलीस दलात खळबळ उडाली असून आरोपीला अटक करण्यात आली आहे


बीडच्या पाटोदा पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांनेच तक्रार देण्यासाठी आलेल्या महिलेची ओळख करत अत्याचार केल्याची घटना घडली. उद्धव गडकर असे या नराधम आरोपी पोलीस कर्मचाऱ्याचे नाव आहे या प्रकरणात आज पाटोदा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीला अटक केल्याची माहिती ठाणे प्रमुख सोमनाथ जाधव यांनी दिली.