Cyber Security: सायबर सुरक्षा या विषयावर सेमिनारचे आयोज

Bhairav Diwase
चंद्रपूर:-
दिनांक ३ मार्च २०२५ रोजी सरदार पटेल महाविद्यालय, चंद्रपूरच्या संगणकशास्त्र आणि संशोधन विभागाच्या वतीने AACST च्या सहकार्याने सायबर सुरक्षा या विषयावर सेमिनारचे आयोजन करण्यात आले.


डॉ. प्राजक्ता धोटे, प्रमुख, संगणकशास्त्र विभाग, सिटी प्रीमियर कॉलेज, नागपूर या सेमिनारच्या प्रमुख मार्गदर्शक होत्या. आपल्या AACST सादरीकरणाद्वारे त्यांनी सायबर गुन्हे आणि त्यावरील प्रतिबंधात्मक उपाय यावर सविस्तर मार्गदर्शन केले. या सत्राचा उद्देश विद्यार्थ्यांमध्ये सायबर जगत आणि ऑनलाइन सुरक्षा उपायांबाबत जागरूकता निर्माण करणे हा होता.
AACST च्या वतीने या वर्षात १०१ शाळा, महाविद्यालये आणि समाजामध्ये सायबर सुरक्षेची जागरूकता मोहीम राबविण्याचा संकल्प करण्यात आला आहे. कोणत्याही संस्थेत अशी कार्यशाळा आयोजित करायची असल्यास कृपया संपर्क साधावा.

महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पी. एम. काटकर यांनी या उपक्रमाचे कौतुक केले आणि विद्यार्थ्यांना सायबर सुरक्षेचे उपाय अनुसरण्याचा सल्ला दिला. संगणकशास्त्र विभागाचे समन्वयक डॉ. एस. बी. किशोर यांनी सायबर गुन्हेगारी आणि जागरूकतेची गरज या विषयावर आपल्या प्रास्ताविक भाषणातून महत्त्व पटवून दिले.

या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रा. विजयलक्ष्मी पारीक यांनी केले. तसेच डॉ. संदीप गुडेल्लीवार, प्रा. सायदा अली, प्रा. गितेश बुरांडे आणि इतर शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी वर्गाच्या सहकार्याने कार्यक्रम यशस्वीपणे पार पडला.