चंद्रपूर:- चंद्रपूर येथील सरदार पटेल महाविद्यालयात फॅशन डिझाईन विभागातर्फे आयोजित 'होरायझन : द फ्युचर ऑफ स्टाईल २०२५' ग्रँड फॅशन शो येत्या शनिवार दि. २२ मार्च रोजी सायंकाळी साडेपाच वाजता आयोजित करण्यात आलेला आहे. या कार्यक्रमाचे उद्घाटन प्रख्यात अभिनेत्री 'नटरंग फेम' सोनाली कुलकर्णी (अप्सरा) यांच्या हस्ते होणार आहे.
सरदार पटेल महाविद्यालयाच्या स्व. राजेश्वरराव पोटदुखे खुल्या नाट्यगृहात होणाऱ्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सर्वोदय शिक्षण मंडळाचे अध्यक्ष अरविंद सावकार पोरेड्डीवार हे राहणार आहेत, तर यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून कार्याध्यक्ष आ. किशोर जोरगेवार, अतिरिक्त पोलीस अधीक्षक रीना जनबंधू, उपाध्यक्ष सुदर्शन निमकर, सगुणा तलांडी, सचिव प्रशांत पोटदुखे, सहसचिव डॉ. कीर्तीवर्धन दीक्षित, कोषाध्यक्ष संदीप गड्डमवार, सर्वोदय शिक्षण मंडळाचे कार्यकारी सदस्य राकेश पटेल, सुरेश पोटदुखे, चंद्रशेखर वाडेगावकर, जीनेश पटेल हे प्रामुख्याने उपस्थित राहणार आहेत.
तेव्हा या कार्यक्रमाला फॅशन क्षेत्रातील विद्यार्थी, तज्ञ व अभ्यासकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.पी.एम.काटकर व फॅशन डिझाईन विभागप्रमुख डॉ अनिता मत्ते- वडस्कर यांनी केले.