चंद्रपूर:- सरदार पटेल महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभाग, भूगोल विभाग, आणि पर्यावरण शास्त्र विभागाच्या वतीने २२ मार्च जागतिक जल दिनाचे औचित्य साधून महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पी.एम काटकर यांच्या मार्गदर्शनाखाली व उपप्राचार्य डॉ. स्वप्नील माधमशेट्टीवार सर यांच्या अध्यक्षतेखाली जल जागृती करण्यासाठी कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले.
सदर कार्यक्रमात प्रमुख वक्ते म्हणून पर्यावरण शास्त्राचे अभ्यासक प्रा. डॉ.राहुल कांबळे यांनी आपल्या अभ्यासपूर्ण वक्तव्यातून असे म्हटले की चंद्रपूर जिल्ह्यातील पाण्यात आर्सनिकचं प्रमाण आहे जे शरीरासाठी अत्यंत घातक आहे. तसेच त्यांनी ग्लेशियर वितळून समुद्राच्या पाण्यात प्रचंड वाढ होत असून हे समुद्रकिनारी असणाऱ्या शहरांसाठी धोकादायक हे आहे, हे दृकश्राव्य माध्यमातून विद्यार्थ्यांना समजावून सांगितले.
तर कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. स्वप्नील माधमशेट्टीवार यांनी पाण्याचे रासायनिक गुणधर्म कसे आहेत, व पाणी हे मानवांसाठी किती महत्त्वाचे आहे हे आपल्या अध्यक्षीय मार्गदर्शनातून विद्यार्थ्यांना पटवून सांगितले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक भूगोल विभाग प्रमुख डॉ. वनश्री लाखे यांनी केले. तसेच विद्यार्थ्यांना जल प्रतिज्ञा देण्यात आली. Aयाप्रसंगी मंचावर राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे समन्वयक डॉ. कुलदीप आर. गोंड, डॉ. निखिल देशमुख, डॉ. पुरुषोत्तम माहुरे, डॉ. वंदना खणके विराजमान होते. कार्यक्रमाला राष्ट्रीय सेवा योजना, भूगोल विभाग आणि पर्यावरण शास्त्र विभागाचे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या कार्यशाळेच्या कार्यक्रमाचे संचालन रसेयो स्वयंसेविका कु. सौंदर्या दुधकोहर तर आभार कु. श्रुती निकुरे यांनी मानले.
या कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता रसेयोचे स्वयंसेवक दर्शन मेश्राम, गौरव झाडे, साहिल गायकवाड, नेहा भोमले, अंकिता लिफ्टे, स्नेहा चौधरी यांनी अथक परिश्रम घेतले.
सर्वोदय शिक्षण मंडळाचे अध्यक्ष अरविंद सावकार पोरेड्डीवार, कार्याध्यक्ष आ. किशोर जोरगेवार, उपाध्यक्ष सुदर्शन निमकर, सगुणा तलांडी, सचिव प्रशांत पोटदुखे, सहसचिव कीर्तीवर्धन दीक्षित, कोषाध्यक्ष संदीप गड्डमवार, सर्वोदय शिक्षण मंडळाचे कार्यकारी सदस्य राकेश पटेल, सुरेश पोटदुखे, चंद्रशेखर वाडेगावकर, जीनेश पटेल, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पी. एम. काटकर, उपप्राचार्य डॉ. स्वप्नील माधमशेट्टीवार, प्रभारी प्रबंधक विनोद चोपावर यांनी उपरोक्त उपक्रमाबद्दल शुभेच्छा दिल्यात.