हिंगोली:- हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी इथं घडली आहे. या घटनेनं सर्वच जण हादरून गेले आहेत. शिवाय सख्खा भाव आपल्या सख्ख्या मोठ्या भावा बरोबर असं काही भयंकर करू शकतो का? याची चर्चा सगळीकडे रंगली आहे.
ही अंगावर काटा आणणारी भयंकर घटना हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी तालुक्यातील दाती या गावात घडली आहे. या गावात अशोक सुर्यवंशी आणि रामराव सुर्यवंशी हे दोघे सख्खे भाव राहात होते. अशोक हा मोठा तर रामराव हा छोटा भाऊ होता. गावात या दोघांची वडीलोपार्जीत शेती होती. याच शेतीवरून या दोघांमध्या वाद होता. शिवाय पैशाच्या देवाण घेवाण वरून ही त्यांच्यात सतत भांडणं ही होत होती.
मात्र हे भांडण अगदी टोकाला गेलं. ते इतकं की भाऊ भावाच्या जीवावर उठवा. त्यातूनच लहान भावाने भयंकर कृत्य करण्याचा निर्णय घेतला. त्याने मोठा भाऊ असलेल्या अशोक यांच्यावर धारधार शस्त्राने वार केला. तेवढ्यावर भागलं नाही म्हणून त्याच्यावर लाकडाने हल्ला केला. या हल्ल्यात अशोक यांचा जागीच मृत्यू झाला. भावालाच खल्लास केल्यानंतर रामरावने तिथून पळ काढला. झालेल्या घटनेची माहिती पोलिसांना मिळाली.
त्यानंतर आखाडा बाळापूर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. या प्रकरणी गुन्हाही दाखल करण्यात आला आहे.शिवाय आरोपी रामराव याला ही अटक करण्यात आली आहे.