नागपूर:- नागपूर हिंसाचारामागचा मास्टरमाईंड फहीम खान याच्या घरावर आज मनपाकडून बुलडोझर कारवाई करण्यात आली. आज मनपाने फहीम खानच्या अनधिकृत बांधकामावर कारवाईचा बडगा उगारला. या दरम्यान या परिसरात मोठा पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
नागपुरातील दंगलीचा सूत्रधार फहीम खान शमीम खान याच्या घरावर मनपाने बुलडोझर कारवाई केली आहे. फहीम खानचे घर बांधताना काही फुटांच्या जागेवर अतिक्रमण झाले आहे. नागपूर महापालिकेने फहीम खानच्या कुटुंबीयांना याची नोटीस बजावली. 'दंगेखोरांवर आवश्यक ती कारवाई करण्यात येईल. त्यांच्या घरावर बुलडोझर चालवण्यात येईल,' असा इशारा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला होता. त्यानंतर महापालिकेने लगेच फहीम खानच्या कुटुंबीयांना अतिक्रमणबाबत नोटीस दिली. त्यामुळे फहीमच्या घरावर बुलडोझर चालवण्यात आला आहे.