Chandrapur News: दहशत माजविणाऱ्याच्या पोलीसांनी आवळल्या मुसक्या; तलवारी हस्तगत

Bhairav Diwase

चंद्रपूर:- हातात तलवार घेवून वार्डात दहशत पसरविणाऱ्या आरोपीच्या रामनगर गुन्हे शोध पथकाने मुसक्या आवळल्या आहे. दिनांक १२/४/२०२५ रोजी पोस्टे रामनगर येथील गुन्हे शोध पथकातील अधिकारी व कर्मचारी स्टाफ हे पोलीस स्टेशन हद्दीत पेट्रोलींग करीत असतांना रात्रो अंदाजे ८ वाजताच्या सुमारास त्यांना मुखबीरव्दारे खबर मिळाली की नागपूर रोड दत्त नगर वार्ड भारत फोम दुकानाचे मागे एक इसम हा त्याचे हातात एक लोखंडी तलवार घेवून वार्डात दहशत पसरवून कोणतारी हस्तक्षेपीय गुन्हा करण्याचे उद्देशाने सार्वजनिक आम रस्त्यावर फिरत आहे. अशा माहिती वरून सदर घटनेचे गांर्भीर्य लक्षात घेवून रामनगर गुन्हे शोध पथकाने तात्काळ घटनास्थळी जावून आरोपी नामे प्रेम अमर बोपारे, वय २५ वर्ष, राहणार दत्तनगरवार्ड नागपूर रोड चंद्रपूर ह्यास ताब्यात घेवून त्याचे ताब्यातुन एक धारधार स्टिल मुळ असलेली लोखंडी तलवार जप्त करून त्यास पुढील कार्यवाहीस ताब्यात घेवून त्याचे विरूध्द पोलीस स्टेशन रामनगर जि. चंद्रपूर येथे अप क. ३००/२५ कलम ४, २५ भारतीय हत्यार कायदा सह कलम १३५ मपोका अन्वये गुन्हा नोद करण्यात आला.

सदरची कार्यवाही मा. पोलीस अधिक्षक श्री. मुमक्का सुदर्शन सा. चंद्रपूर, मा. अपर पोलीस अधिक्षक रिना जनबंधु मॅडम, मा. उपविभागीय पोलीस अधिकारी श्री सुधाकर यादव या. यांचे मार्गदर्शनाखाली वरीष्ठ पोलीस निरीक्षक असीफराजा शेख, तसेच गुन्हे शोध पथक रामनगर चे प्रमुख सपोनी देवाजी नरोटे, सपोनी उगले, पोहवा/०९ पेत्रस सिडाम, पोहवा /२२७३ शरद कुडे, पोहवा /१४४६ सचिन गुरनुले, पोहवा /११६५ आनंद खरात, पोहवा / २४५४ प्रशांत शेंद्रे पाहवा / २४३० लालु यादव, मपोहवा/४६२ मनिषा मोरे पांशि ८२५ हिरालाल गुप्ता, पोशि७८७ रविकुमार ढेंगळे, पोशि ६३० प्रफुल पुष्पलवार, पोशि/८८१ संदीप कामडी, पोशि १२३०/ पंकज ठोंबरे, मपोशि २६५३ व्युल्टी माखरे यांनी कार्यवाही केली.