Chandrapur News: मनपा उपायुक्तांच्या वाहनावर उधळल्या "नोटा"
गुरुवार, एप्रिल १७, २०२५
चंद्रपूर:- १ एप्रिल २०२५ पासून चंद्रपूर महानगरपालिकेने ॲम्बुलन्स,शव वाहिका, पाण्याचे टँकर इत्यादी मूलभूत सेवांच्या दरात मोठी वाढ केली. या दरवाढीने संतप्त झालेल्या जनविकास सेनेने संस्थापक अध्यक्ष पप्पू देशमुख यांचे नेतृत्वात उपायुक्त मंगेश खवले यांच्या गाडीवर नोटा उधळून 'घे पैसा' आंदोलन करण्यात आले. १६ एप्रिल रोजी दुपारी १२ च्या दरम्यान गांधी चौकातील मनपा इमारतीसमोर हे आंदोलन झाले.
शहराच्या हद्दीमध्ये यापूर्वी मनपाच्या ॲम्बुलन्सची सेवा निशुल्क होती. आता यासाठी ५०० रुपये भाडे आकारण्यात येणार आहे. मनपा हद्दीच्या बाहेर ॲम्बुलन्स व शव वाहिकेसाठी साठी २०० रुपये भाडे आकारण्यात येत होते. १ एप्रिल पासुन मनपा यासाठी २०० ऐवजी १००० रुपये म्हणजेच पाचपट भाडे आकारण्यात येणार आहे. खाजगी ॲम्बुलन्स व शव वाहिका चालक १५ किलोमीटर मागे एक लिटर पेट्रोल- डिझेलचा खर्च घेतात. मनपा ॲम्बुलन्ससाठी १० किलोमीटर मागे एक लिटर पेट्रोल व शव वाहिकेसाठी ८ किलोमीटर मागे एक लिटर डिझेल घेत असल्याने इंधनाचा खर्चही जास्त लागणार आहे.याचा मोठा फटका शहरातील तसेच आसपासच्या गोरगरीब व गरजू लोकांना बसणार आहे.
Tags