चंद्रपूर:- पोलीस स्टेशन चिमुर अंतर्गत दोन अल्पवयीन मुलींसोबत घडलेल्या लैगिंक अत्याचार प्रकरणी पोलीसांनी गुन्हा नोंद करुन गुन्हयात दोन आरोपीतांना तात्काळ अटक करुन पुढील कायदेशीर कारवाई करीत असतांना काही नागरीकांकडुन बेकायदेशीर रित्या जमाव जमवुन पोलीसांच्या कायदेशीर रखवालीत असलेले गुन्हेगारांना तात्काळ फासी देण्याची घोषणाबाजी करुन गुन्हेगारांना नागरीकांच्या ताब्यात देणे बाबत दबाव टाकुन नारेबाजी व घोषणाबाजी करुन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करण्याचा प्रयत्न केला असे कृत्य समाज हिताय नाही. गुन्हेगारांना फाशी व शिक्षा देणे हा न्यायालयीन प्रक्रियेचा भाग आहे, त्यामुळे नागरीकांनी कायदा हातात घेवुन गुन्हेगारांना मारहाण करु नये, मारहाणीत गंभीर जखमी झाल्यास किंवा मृत्यु झाल्यास आपल्याविरुध्द गंभीर गुन्हा दाखल होऊ शकतो.
या द्वारे नागरीकांना आवाहन करण्यात येते की, लैगिंक अत्याचाराची घटना, प्राणांतिक अपघाताची घटना, समाज माध्यामावरील प्रसारीत / व्हॉयरल होणाऱ्या जातीय तेढ निर्माण करणारी घटनाचे प्रसंगी कुणीही कायदा व सुव्यवस्था बिघडेल असे वर्तन करु नये. तसेच राजकीय व सामाजिक पदाधिकाऱ्यांनी सुध्दा आपल्या स्तरावर आपले हद्दीतील सुरक्षितता व शांतता राखण्यासाठी पुढाकार घ्यावा. एखाद्या परिसरात तणाव सद्व्य परिस्थिती निर्माण झाल्यावर त्याचा त्रास सर्व सामान्य नागरीकांना भोगावा लागतो. त्यामुळे कायदा कोणीही हातात घेऊ नये. कृपया सर्वांनी शांतता ठेवावी.
पोलीस स्टेशनवर बेकादेशीर जमाव न जमविता उद्भवलेली परिस्थिती हाताळण्यास पोलीसांना योग्य सहकार्य करावे. घडलेल्या गुन्हयाचा सखोल तपास करुन पिडीतेस न्याय मिळवुन देण्याची जबाबदारी पोलीसांची आहे यासाठी सुध्दा नागरीकांनी सहकार्य करुन सामाजिक बांधीलकी जपावी. कोणीही अफवा पसरवू नये, कोणीही अफवांवर विश्वास ठेवू नये, जिल्हयात शांतता व सौहार्दपूर्ण वातावरण अबाधित ठेवण्यासाठी पोलीस प्रशासनाला सहकार्य करावे.