Accident News: मोटारसायकल अपघातात तीन युवक जागीच ठार

Bhairav Diwase
चामोर्शी:- चामोर्शी तालुक्यातील सुभाषग्राम- घोट मार्गावरील ठाकूरनगर पहाडाजवळ भरधाव मोटारसायकल झाडाला धडकल्याने तीन युवक जागीच ठार झाले. मृतांमध्ये दोन सख्ख्या भावांचा समावेश आहे. घटनेनंतर मोटारसायकलने पेट घेतला. ही घटना आज सकाळी साडेनऊ वाजताच्या सुमारास घडली.

साहेब सुभाशिष चक्रवर्ती ( वय १६) सौरभ सुभाशिष चक्रवर्ती (वय २०)दोघेही रा.वसंतपूर आणि विशाल भुपाल बच्छाड ( वय १९) रा. १० नंबर, शिरपूर (तेलगंणा) अशी मृतांची नावे आहेत. साहेब व सौरभ चक्रवर्ती हे दोन भाऊ त्यांचा तेलंगणा राज्यातील नातेवाईक विशाल बच्छाड याच्यासह मोटारसायकलने वसंतपूर येथून घोटकडे जात होते. ठाकूरनगर पहाडाजवळ पोहचताच मोटारसायकल अनियंत्रित होऊन ती एका झाडाला आदळली. यात तिघेही घटनास्थळीच ठार झाले. अपघातानंतर मोटारसायकलने पेट घेतला. माहिती कळाल्‍यानंतर घोट पोलिस मदत केंद्राचे पोलिस निरीक्षक नीतेश गोहणे आपल्या सहकाऱ्यांसह घटनास्थळी पोहचले. पंचनामा केल्यानंतर त्यांनी मृतदेह विच्छेदनासाठी चामोर्शी येथील ग्रामीण रुग्णालयात पाठवले.