कोरपना:- गडचांदूर शहरात गुरुवारी सकाळी प्रज्वल नवले याचा मृतदेह सावित्रीबाई फुले विद्यालयाच्या मागे आढळून आला व त्याचा मित्र नागेश लांडगे हा बेशुद्ध अवस्थेत सापडला. त्याला शहरामध्ये प्राथमिक उपचार करून चंद्रपूर वैद्यकीय महाविद्यालयाच्या अतिदक्षता विभागात हलवण्यात आले. त्याला विषबाधा झाली या निष्पन्नतेच्या आधारे डॉक्टरांनी उपचार केले. परंतु ३ दिवसांनी त्यांची मृत्यूसोबतची झुंज शेवटी अपयशी ठरून ती हरली. त्याचा १२ एप्रिलला मृत्यू झाला. त्यामुळे या दोघांच्या रहस्यमय मृत्यूने गूढ अजूनही कायम आहे.
गडचांदूर शहरात गुरुवारी प्रज्वलच्या मृत्यूने वेगवेगळ्या चर्चांना उधाण आलं होते. त्यातच आता नागेशच्या मृत्यूने हे प्रकरण जटील बनलं आहे. हे दोघे कसं काय विष किंवा विषयुक्त पेय घेऊ शकतात यावर कुटुंबीयांना शंका आहे. कारण घरी जेव्हा नागेश त्या मुलीचा संदेश घेऊन आला त्यानंतरच त्याच्यासोबत अशी घटना झाली यावर प्रज्वलचे कुटुंबीय ठाम आहे. या दोघांच्या मृत्यूचे कारण अद्याप स्पष्ट झाले नाही.