Mashal Movement: शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी आमदाराच्या घरावर ‘प्रहार’ चे मशाल आंदोलन

Bhairav Diwase

राजुरा:- टेंभा आंदोलन करतांना शेतकरी कर्जमाफी पेरणी ते कापणी पर्यंत MRGS मधून करणे दिव्यांग बांधवांना मासिक 6000 मानधन देण्यात यावे आदी मागण्यासाठी स्थानिक आमदार देवराव भोंगळे यांच्या निवासस्थान समोर प्रहार जनशक्ती पक्ष संस्थापक अध्यक्ष बच्चू कडू यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हाध्यक्ष सतिश बिडकर कोरपना तालुका अध्यक्ष विनोद शिंदे, गडचांदुर शहर अध्यक्ष सतीश शेरे, चंद्रपूर तालुका अध्यक्ष शहर अमित यादव ग्रामीण तालुका अध्यक्ष अमोल मांढरे , राजुरा चंद्रपूर मतदार संघातील अनेक प्रहार सेवकाचां समावेश होता.

स्थानिक आमदार देवराव भोंगळे यांच्या निवासस्थान समोर टेंभा आंदोलन करण्यात आले यावेळी हातात टेंभा (मशाल ) भगवा ध्वज गळ्यात निळा दुपट्टा जय जवान जय किसान, शेतकऱ्यांचे कर्ज माफ झालेच पाहिजे दिव्यांगाना 6000 सहा हजार मानधन मिळालेच पाहिजे शेतमालाला हमी भाव मिळातेच पाहुणे यांच्यासह यासह अनेक मागण्याचे निवेदन देण्यात आले या सोबत असंख्य कार्यकर्ते व शेतकरी उपस्थित होते.


राज्यातील शेतकऱ्यांची फसवणूक झाल्याचा आरोप करत प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी कर्जमाफीसाठी मशाल आंदोलन जाहीर केले आहे. कर्जमाफीच्या मुद्द्यावरून घुमजाव करणाऱ्या सरकारविरोधात रान पेटविण्याचा इशारा माजी आमदार तसेच प्रहार जनशक्‍ती पक्षाचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी दिला आहे. या अंतर्गत पहिल्या टप्प्यात महात्मा फुले यांच्या जयंतीदिनी शुक्रवारी (ता. ११) रात्री १२ वाजता राज्यातील प्रत्येक आमदाराच्या घरासमोर मशाल आंदोलन केले जाणार याची घोषणा करताच अनेक आमदार व मंत्री यांची झोपच उडाली महत्वाच म्हणजे रात्री 12 वाजता मशाल धडकणार म्हणून पोलिसांचा मोठा फौज फाटा तैनात करण्यात आला आमदार भोंगळे हे रात्री 12.30 वाजता येऊन आंदोलकांचे निवेदन स्वीकारले शेतकऱ्यांचे. कर्ज माफ करण्यासाठी पुरेपूर प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले.