Raid on gambling den : वर्धा नदीच्या काठावरील जुगार अड्ड्यावर छापा

Bhairav Diwase

चंद्रपूर:- दि. 11/4/2025 रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पथक पोलीस अधीक्षक चंद्रपुर यांचे आदेशाने पोस्टे बल्लारशाह हद्दीत पेट्रोलींग करीत असतांना बल्लारशाह पेपर मीलच्या मागे, वर्धा नदीच्या काठी निखील रणदिवे रा. बल्लारशाह हा इसम काही इसमांना सोबत घेऊन 52 ताश पत्याचा कट पत्याचा जुगार खेळत असल्याची गोपनिय बातमीदारकडुन मिळालेल्या माहीती वरून सदर ठिकाणी स्थानिक गुन्हे शाखेचे पथकाने सापळा रचुन छापा मारला.


घटनास्थळावर चंद्रपूर, राजुरा, बल्लारशा येथील राहणारे एकुण अकरा आरोपीत इसम जुगार 52 ताश कट पत्ता गेम खेळत असतांना मिळुन आले. जुगाराचे डावावर व त्यांचे अंगझडतीत एकुण 1.78.300 रूपयांचा मुद्देमाल मिळुन आला.

अकरा आरोपींना ताब्यात घेवुन त्यांचे विरुद्ध पोस्टे बल्लारशाह येथे अप क 267/2025 कलम 12(अ) महाराष्ट्र जुगार कायदा अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला. पुढील तपास पोस्टे बल्लारशाह करीत आहे.

सदरची कार्यवाही पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक रिना जनबंधु यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अमोल काचोरे स्थानिक गुन्हे शाखा चंद्रपुर यांचे नेतृत्वात स्था.गु.शा.चे पोलीस उपनिरीक्षक, विनोद भुरले, पोउपनि. मधुकर सामलवार पोउपनि संतोष निंभोरकर, पोउपनि गौरकार, सफौ. करकाडे, पो. हवा. सतिश अवथरे, रजनिकांत पुठ्‌ठावार, नितीन कुरेकार, पो.कॉ. प्रशांत नागोसे, शशांक बादमवार, प्रफुल गारघाटेयांनी केली आहे.