चंद्रपूर:- स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपूरच्या पथकाने एका मोठ्या कारवाईत भंगार चोरी करणाऱ्या टोळीला अटक केली आहे. पोलिसांनी त्यांच्याकडून चोरीला गेलेला माल आणि गुन्ह्यात वापरलेली वाहने असा एकूण ५,७९,०००/- रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
या चोरीच्या घटनेची गंभीर दखल घेत, स्थानिक गुन्हे शाखेचे उप-विभाग, चंद्रपूरचे अधिकारी व कर्मचाऱ्यांचे पथक चोरी गेलेला माल आणि अज्ञात आरोपींचा शोध घेण्यासाठी चंद्रपूर शहरात रवाना झाले. पथकाने गोपनीय माहितीच्या आधारे आणि तांत्रिक कौशल्याचा वापर करून तपास सुरू केला. या तपासादरम्यान मिळालेल्या माहितीनुसार, पोलिसांनी गोल बाजार, तिलक मैदान, चंद्रपूर येथून चार आरोपींना ताब्यात घेतले.
पोलिसांनी अटक केलेल्या आरोपींची नावे खालीलप्रमाणे आहेत:
१) हर्षद कालिदास मेश्राम, वय-२४ वर्ष, रा. अष्टभुजा वार्ड, चंद्रपूर.
२) धनराज सुधार लोणारे, वय-३० वर्ष, रा. गोपाल पुरी वार्ड, चंद्रपूर.
३) आशिष भगवाना आल्लेवार, वय-२४ वर्ष, रा. भिवापूर वार्ड, चंद्रपूर.
४) अमन अजीच शेख, वय ३८ वर्ष, रा. भिवापूर वार्ड, चंद्रपूर.
आरोपींच्या ताब्यातून पोलिसांनी चोरीला गेलेले ३१ नग लोखंडी चॅनल, गुन्ह्यात वापरलेली ई-रिक्षा (क्रमांक अज्ञात) आणि एक मोपेड गाडी (क्रमांक अज्ञात) असा एकूण ५,७९,०००/- रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
सदर यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक श्री. मुम्मका सुदर्शन साहेब, चंद्रपूर आणि अपर पोलीस अधीक्षक रीना जनबंधु मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अमोल काचोरे यांच्या नेतृत्वात पार पडली. या कारवाईत पोलीस उपनिरीक्षक विनोद भुरले, पोलीस उपनिरीक्षक मधुकर सामलवार, पोलीस उपनिरीक्षक सुनील गौरकार, पोलीस हवालदार सतीश अवथरे, पोलीस हवालदार रजनिकांत पुठ्ठवार, पोलीस हवालदार दीपक डोंगरे, पोलीस अंमलदार प्रशांत नागोसे, पोलीस अंमलदार किशोर वाकाटे आणि पोलीस अंमलदार शशांक बदामवार यांच्यासह स्थानिक गुन्हे शाखेच्या इतर कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला.