Petrol poured on the body: "दुसऱ्यांचे सोडता, माझेच ट्रॅक्टर का पकडता?" युवकाचा सवाल अन् अंगावर ओतलं पेट्रोल!

Bhairav Diwase


वर्धा:- सध्या सर्वत्र वाळू माफियाची सर्वाधिक चर्चा होत असते. तसेच त्यांनी अधिकारी वर्गावर केलेली बळजोरीचे पण किस्से गाजतात. येथे मात्र अधिकारी वर्ग अन्याय करीत असल्याचा आरोप करीत एका युवा ट्रॅक्टर मालकाने स्वतःला पेटवून घेण्याचा थरार घडला आहे. हिंगणघाट तहसील कार्यालयातच ही घटना घडली. पेटवून घेण्याचा प्रयत्न करणाऱ्या युवकाचे नाव छोटू दिलीप वानखेडे असे आहे.

दुपारी त्याने तहसील कार्यालय गाठले. भावना व्यक्त केली. आणि लगेचच पिशवीतून पेट्रोलची कॅन काढून त्यातील पेट्रोल अंगावर ओतले. आगपेटीची काडी काढून पेटवून घेणार तोच उपस्थित कर्मचाऱ्यांनी सावध होत त्यास पकडून ठेवले. प्रशासन मला आत्मदहन करण्यास भाग पाडत आहे, असा आरोप पण त्याने केला. मी जगू तरी कसा, असाही त्याचा सवाल आहे. आपली आर्थिक स्थिती बिघडली असून ट्रॅक्टर पकडण्याच्या कारवाईमुळे त्रस्त झाल्याचे त्याने नमूद केले.