Click Here...👇👇👇

Chandrapur News: चंद्रपूरातील नाल्याच्या संरक्षण भिंतीचे प्रकरण विधानसभेत गाजले!

Bhairav Diwase

चंद्रपूर:- चंद्रपूर महानगरपालिका क्षेत्रात हवेली गार्डन ते आकाशवाणी रोडवरील नाल्याच्या संरक्षण भिंतीच्या बांधकामासाठी 95 लाख रुपये खर्च करण्यात आले. पण येथे निर्माण होणारी पुर परिस्थिती लक्षात न घेता ही भिंत बांधल्याचे दिसते. चुकीच्या ठिकाणी बांधकाम केल्याचे दिसून येते. याची चौकशी करून कारवाई करणार का? असा प्रश्न सुधीर मुनगंटीवार यांनी विधानसभेत विचारला.


याच प्रश्नाला धरुन केवळ एका बाजूलाच भिंत उभारली आहे. शिवाय दोन धनाढ्य लोकांचे बंगले या नाल्याच्या शेजारी आहेत तेवढीच संरक्षण भिंत बांधली आहे. एका व्यक्तीला त्याच्या जागेला संरक्षण देण्यासाठी 95 लाख रुपये खर्च झाला आहे. भर टाकून नाला बांधला आहे याची चौकशी करा आणि या नाल्याची रुंदी पहिल्याप्रमाणे राहिल का? असा प्रश्न विजय वडेट्टीवार यांनी विचारला. तसेच मुनगंटीवार यांना बोलण्यास मर्यादा आहे. ते बांधकाम चुकीचे झाले आहे. म्हणून चुकीचे बांधकाम करण्यात जे जे दोषी आहेत त्यांच्या वर कारवाई करणार का? हा प्रश्न आहे, असे वडेट्टीवार म्हणाले.

मुनगंटीवार यांच्या प्रश्नाला उत्तर देताना मंत्री संजय राठोड यांनी सांगितले की, हे काम जिल्हा नियोजन समिती मधून केले होते. मुख्य भागातून नाला जातो. उर्वरित बांधकाम बाबत जिल्हा नियोजन समितीकडे प्रस्ताव पाठवतो तसेच भूमिलेख अभिलेखाकडून याची निश्चितपणे चौकशी केली जाईल, असे आश्वासन सभागृहात दिले.

यावर निश्चितपणे नैसर्गिक राहील, असे ॲक्शन घेण्याचे आदेश द्या, हे काय दादा कोंडकेंचे डबल मिनिंग उत्तर आहे का? असे मुनगंटीवार म्हणाले. तर मुनगंटीवार यांनी मांडलेल्या प्रश्नाची दखल घेऊन नाल्याची नैसर्गिक रुंदी राखण्यात यावी, असे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी निर्देश दिले.

चंद्रपूरचे भाजप आमदार जोरगेवार यांनी या भिंतीसाठी विशेष प्रयत्न केले. या वेळी त्यांनी ही आपली बाजू मांडली. हा प्रश्न आपल्या मतदार संघातला आहेत. त्यामुळे जे आरोप केले जात आहेत ते चुकीचे आहेत असं ते म्हणाले. विरोधक त्यात हवा भरत आहेत. पण प्रश्न आमच्याच लोकांनी उपस्थित केला आहे, असं म्हणत यांनी मुनगंटीवार यांच्याकडे ही बोट दाखवले. शिवाय यात कुठलाही भ्रष्टाचार झाला नाही. या नाल्या भोवती आणखी काही संरक्षण भींती बांधल्या जाणार आहेत. त्यासाठी निधी मंजूर झाल्याचं ही त्यांनी सांगितलं.