Click Here...👇👇👇

Sudhir mungantiwar: आ. सुधीर मुनगंटीवार ठरले ‘पॉवरफुल्ल’!

Bhairav Diwase

चंद्रपूर:- राज्याचे माजी वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री तसेच बल्लारपूर विधानसभेचे आमदार आ. श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी पुन्हा एकदा आपल्या प्रभावी नेतृत्वाची ठसठशीत छाप सोडली आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने संपूर्ण महाराष्ट्रात मंजूर केलेल्या एकूण आठ कामांपैकी १६७ कोटी रुपयांची तब्बल पाच कामे बल्लारपूर विधानसभेसाठी मंजूर झाली आहेत. आ. मुनगंटीवार यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळेच शक्य झाले आहे.

थेट संवाद, स्पष्ट मागणी, प्रभावी पाठपुरावा आणि प्रशासनावर पकड ही आ. मुनगंटीवार यांच्या कार्यशैलीची वैशिष्ट्ये आहेत. सभागृहात त्यांनी वारंवार दिलेले मुद्देसूद आणि तडाखेबाज भाषण, तसेच प्रत्यक्षात निधी खेचून आणण्यातली तंत्रशुद्ध कामगिरी, यामुळेच त्यांनी हा ठसा उमटवला आहे. नेतृत्व कसे असते, हे त्यांनी पुन्हा सिद्ध करून दाखवले आहे.

या मंजूर कामांसाठी १६७ कोटींच्या पुढील निधीची तरतूद आहे. यामध्ये पोंभुर्णा शहरातील अनेक विकासकामांना गती मिळणार आहे. यामुळेच आ. सुधीर मुनगंटीवार यांची ठाम, अभ्यासू व परिणामकारक नेतृत्त्वशैली पुन्हा अधोरेखित झाली आहे.

या कामांचा समावेश

चंद्रपूर जिल्ह्यातील मरेगाव-राजगड-गडीसूर्ला-थेरगाव-वढोली-घाटकुल रस्ता (घाटकुल ते भीमनी फाटा) आणि केळझर स्टेशन ते सुशी नवेगाव भुज कोरंबीपर्यंत सिमेंट काँक्रीट रस्त्याचे बांधकामासाठी ४५ कोटी रूपये मंजुर.

बल्लारपूर मतदारसंघातील आक्सापूर ते चिंतलधाबा रस्त्याच्यामध्ये सिमेंट काँक्रीट रस्त्याचे व दोन लहान पुलांचे बांधकामासाठी ५० कोटी रूपये मंजुर.

- चंद्रपूर जिल्ह्यातील मरेगाव-आकापुर-राजगड-फिस्कुटी-गडीसूर्ला-भेजगाव-सिंताळा-थेरगाव-वेळवा-सोनापूर-चेक-बल्लारपूर-वढोली-घाटकुल रस्त्याचे बांधकाम. घाटकुल येथे भूसंपादनासह वळणमार्गाचे बांधकामासाठी १७ कोटी रुपये मंजूर.

- चंद्रपूर जिल्ह्यातील कोसारा-सोईट-वरोरा-मोहोर्ली चंद्रपूर-जुनोना-गिलीबीली-पोंभुर्णा-नवेगाव-मोरे रस्त्याचे बांधकाम. या रस्त्यावर मोठ्या पुलाचे व पोचमार्गाचे भूसंपादानासह बांधकाम करणे तसेच सेवावाहिन्या स्थलांतरित करण्यासाठी ४० कोटी रुपये मंजूर.

- चंद्रपूर जिल्ह्यातील जुनोना-गिलबिली-सातारा-तुकूम-पोंभुर्णा-नवेगाव मोरे रस्ता व नवेगावमोरे येथे वळणमार्गाचे भूसंपादनासह बांधकामासाठी १५ कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहे.

या सर्व कामासाठी एकूण १६७ कोटी रुपये इतका मोठा निधी आ. सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकारामुळे मंजुर झाला आहे.

विकासाचा धडाका

संपूर्ण चंद्रपूर जिल्ह्यात आ. सुधीर मुनगंटीवार यांच्या नेतृत्वाखाली यापूर्वी अफाट विकासकामे करून आ. श्री. मुनगंटीवार यांनी कार्यक्षमतेचे शिखर गाठले आहे. सैनिकी शाळा, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, वन प्रशासन व व्यवस्थापन प्रबोधिनी (वन अकादमी), बांबू संशोधन व प्रशिक्षण केंद्र, बॉटनिकल गार्डन, कॅन्सर हॉस्पीटल उभे राहत आहे,शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय, S.N.D.T. महिला विद्यापीठाचे केंद्र, डायमंड कटिंग सेंटर, सोमनाथ (मुल) कृषी महाविद्यालयाला मंजूरी, पोंभुर्णा येथे बांबू हँडीक्राफ्ट व आर्ट युनिट, टूथपिक उत्पादन केंद्र, डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम उद्यान, आगरझरी – बटरफ्लाय गार्डन, भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी इको पार्क, अजयपूर – शेतकरी प्रशिक्षण केंद्र, प्रियदर्शिनी इंदिरा गांधी सांस्कृतिक सभागृहाचे आधुनिकीकरण, चंद्रपूर फ्लाइंग क्लब सुरु झाले, बल्लारपूर येथे सुषमा स्वराज कौशल्य विकास केंद्र लवकरच सुरु होत आहे,आदी कामे आ. मुनगंटीवार यांनी केलेली आहे. या प्रकल्पांच्या माध्यमातून त्यांनी केवळ विकासाचे नव्हे, तर उद्योग, शिक्षण, पर्यावरण, पर्यटन आणि रोजगारनिर्मितीच्या दिशेनेही मोठी झेप घेतली आहे. हजारो कोटी रुपयांचा निधी जिल्ह्यात खेचून आणणे हे त्यांच्या कर्यक्षम नेतृत्वाचे जिवंत उदाहरण ठरले आहे.

बल्लारपूर विधानसभेच्या पाच कामांना मिळालेली मान्यता ही आकड्यांमधील यशाची केवळ एक झलक आहे. आ. सुधीर मुनगंटीवार यांची नेतृत्वशैली ही निर्णयक्षम, अभ्यासपूर्ण आणि परिणामकारक आहे. त्यामुळेच चंद्रपूर जिल्ह्याचा चेहरा बदलणारी ही कामगिरी ‘पॉवरफुल्ल’ ठरत आहे, हे विशेष.