टिंकू नामदेव भोयर (14), तन्मय बालाजी मानकर (16), दुषण दुर्योधन मेश्राम (14), तुषार राजेंद्र मारभते (14) सर्व राहणार काटली अशी मृतांची नावे आहे. धडक दिल्यानंतर अंधाराचा फायदा घेत ट्रक चालक पसार झाला. या घटनेनं नागरिकांनी संताप व्यक्त करत मार्ग रोखण्याचा प्रयत्न केला.
मिळालेल्या माहितीनुसार सहाही मुले नेहमीप्रमाणे पहाटे फिरण्यासाठी गेले होते. गडचिरोली-आरमोरी मार्गांवरील काटली गावापासून एक किमी अंतरावर असलेल्या नाल्याजवळील मार्गावर मुलं बसली होती. दरम्यान 5 वाजून 10 मिनिटाच्या सुमारास एका भरधाव अवजड वाहनाने सहाही मुलांना उडवलं. यात टिंकू आणि तन्मय या दोघांचा जागीच मृत्यू झाला. या अपघातानंतर काटली गावात शोककळा पसरली आहे, संतप्त गावकऱ्यांकडून राष्ट्रीय महामार्गावर चक्काजामचा प्रयत्न सुरू आहे. गडचिरोली पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. पोलिसांनी वाहन व चालकाचा शोध सुरू केला आहे. या प्रकरणी पोलिसांकडून पंचनामा करण्यात आला असून, पुढील तपास सुरू आहे.