चंद्रपूर:- दिनांक- ०४/०८/२०२५ रोजी चे रात्री ०३.०० वा.चे सुमारास रामनगर पोलीस स्टेशन माहिती प्राप्त झाली की, आष्टभूजा वार्ड, चंद्रपूर येथील छोटू उर्फ मृणाल प्रकाश हेडाऊ, वय- ३५ वर्षे याचा मारहाण करून कोणीतरी खून केला आहे. त्याबाबत पोलीस स्टेशन रामनगर येथे अपराध क्र. ६२१/२०२५ कलम १०३(१), ३३३, ३(५) बी.एन.एस. नुसार गुन्हा दाखल केला. त्याबाबत मा. पोलीस अधीक्षक श्री. मुमक्का सुदर्शन, मा. अपर पोलीस अधीक्षक श्री. ईश्वर कातकडे, मा. उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. सुधाकर यादव यांनी परिस्थितीचे गांभीर्य ओळखून रामनगर पोलीसांना तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे अधिकारी अंमलदार यांना योग्य त्या सूचना देऊन तात्काळ आरोपींचा शोध घेऊन त्यांना अटक करण्याचे आदेश दिले.
त्यानुसार रामनगर पोलीस स्टेशनचे तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे अधिकारी व अंमलदार यांनी घटनास्थळी जाऊन गोपनीय तपास करून सदर मयतास मारहाण करणारे आरोपी १) सुमोहित उर्फ गोलू चंद्रशेखर मेश्राम, वय २६ वर्षे, (२) टिल्लू उर्फ अनिल रामाजी निकोडे, वय- ३० वर्षे, (३) सुलतान अली साबीर अली, वय ३० वर्षे, (४) बबलू मुनीर सय्यद, वय- ३८ वर्षे, सर्व रा. अष्टभूजा वार्ड, चंद्रपूर हे असल्याची गोपनीय माहिती काढून लागलीच त्यांचा शोध घेऊन ताब्यात घेऊन सदर गुन्ह्यात अटक केली आहे. सदर गुन्ह्याचा पुढील तपास स.पो.नि प्रशांत लभाने, पो.स्टे. रामनगर हे करीत असून आरोपींना मा. न्यायालयात हजर केले असता त्यांची ०३ दिवसाचा पोलीस कस्टडी रिमांड दिलेला आहे.
वरील कारवाई ही मा. पोलीस अधीक्षक श्री. मुमक्का सुदर्शन व मा. अपर पोलीस अधीक्षक श्री. ईश्वर कातकडे व मा. उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. सुधाकर यादव यांचे सूचना व मार्गदर्शनाखाली स्था.गु.शा. व रामनगर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक असिफराजा शेख, पो.नि. अमोल काचोरे, सहा. पोलीस निरीक्षक देवाजी नरोटे, सहा. पोलीस निरीक्षक हनुमान उगले, सहा. पोलीस निरीक्षक निलेश वाघमारे, स.पो.नि प्रशांत लभाने, स.पो.नि. शिवाजी नागवे, स.पो.नि. दिपक कांक्रेडवार, पो.उ.नि. विनोद भुरले, पो.उ.नि. हिराजंद गव्हारे, पो.उ.नि. अतुल राठोड पोलीस अंमलदार गजानन नागरे, जितेंद्र आकरे, लालू यादव, शरद कुडे, आनंद खरात, विनोद यादव, बाबा नैताम, मनिषा मोरे, रजनीकांत पुष्ड्डावार, इंदल राठोड, संदिप कामडी, पंकज ठोंबरे, प्रफुल पुप्पलवार, रविकुमार ढेंगळे, हिरा गुप्ता, संदेश सोनारकर, प्रशांत झाडे, सुरेश कोरवार, रूपेश घोरपडे व ब्ल्युटी साखरे यांनी केली आहे.