एक महीला अधिकारी व लिपीक पुरूष आरोपीला अटक
नागभीड:- दिनाक 16.09.2025 रोजी पोलीस स्टेशन नागभीड येथे तक्रारदार नामे श्रीमती शिला महेंद्र गेडाम, बालविकास प्रकल्प अधिकारी, नागभीड यांनी तक्रार दिली की, आरोपी नामे सौ. करिश्मा आशिष मेश्राम वय 29 वर्षे रा. पळसगाव खुर्द हीने अंगणवाडी सेविका पदभरतीचे अर्जासोबत एम.ए. (MA) अंतिम वर्षाची बनावट गुणपत्रिका सादर करून ती खरी म्हणुन वापरून शासनाची फसवणुक केल्यावरून तिचे विरूध्द पो.स्टे. नागभीड येथे अप क्रं. 336/2025 कलम 318 (4), 336(3), 340 (2) भा.न्या.सं. अन्वये नोंद करण्यात आला.
सदर गुन्हयाचे तपासी अधिकारी स.पो.नी. किशोरकुमार वैरागडे यांनी पोलीस निरीक्षक श्री. रमाकांत कोकाटे पो.स्टे. नागभीड यांचे मार्गदर्शनात आरोपी नामे सौ. करिश्मा आशिष मेश्राम वय 29 वर्षे रा. पळसगाव खुर्द हिचे सोबत शिला महेंद्र गेडाम, बालविकास प्रकल्प अधिकारी, नागभीड व प्रशांत देवराव खामणकर, लिपीक, कार्यालय बालविकास प्रकल्प अधिकारी, नागभीड यांचा प्रत्यक्ष सहभाग असल्याचे तपासात निष्पन्न झाले. त्यावरून सदर गुन्हयात कलम 61(2) भा.न्या.सं. वाढ करून शिला महेंद्र गेडाम, बालविकास प्रकल्प अधिकारी, नागभीड व प्रशांत देवराव खामणकर, लिपीक, कार्यालय बालविकास प्रकल्प अधिकारी, नागभीड यांना दि.22.09.2025 रोजी अटक करण्यात आली आहे.
सदरची कामगिरी मा. पो. अ. श्री. मम्मुका सुदर्शन सा. मा. अपर पो. अ. श्री. ईश्वर कातकडे सा. मा. उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. राकेश जाधव सा, मा. पोलीस निरीक्षक श्री. रमाकांत कोकाटे पो.स्टे. नागभीड यांचे मार्गदर्शनात स.पो.नी. किशोरकुमार वैरागडे, पो.अं. विक्रम आत्राम, पो.अं. गायकवाड यांनी कौशल्यपुर्वक मार्गाने तपासाचे धागेदोरे जोडत फसवणुक करणाऱ्या महीला व पुरूष आरोपीच्या मुसक्या आवळल्या आहे.