मुंबई:- महाराष्ट्र सरकारची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. लाडकी बहीण योजनेबाबत सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. आता लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांना केवायसी करणे अनिवार्य आहे. महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरेंनी याबाबत माहिती दिली आहे.
ई-केवायसी करण्याची शेवटची तारीख (Ladki Bahin Yojana E kyc Last Date)
आता लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत असलेल्या प्रत्येक महिलेला केवायसी करणे अनिवार्य आहे. यासाठी दोन महिन्यांची मुदत देण्यात आली आहे. त्याआधी सर्व लाभार्थी महिलांना केवायसी पूर्ण करायची आहे. यासाठीची प्रोसेस ऑनलाइन आहे. तुम्हाला अधिकृत वेबसाइटवर जाऊन ही प्रोसेस पूर्ण करायची आहे.
ई केवायसी कशी करायची? (Ladki Bahin Yojana E kyc online Process)
ई-केवायसीची प्रोसेस ऑनलाइन होणार आहे. तुम्हाला अधिकृत वेबसाइटवर जाऊन ही प्रोसेस करावी लागणार आहे. यासाठी तुम्ही जी कागदपत्रे अर्ज करताना अपलोड केली होती तीच पुन्हा करावी लागणार आहेत. तिच माहिती पुन्हा भरावी लागणार आहे. याची प्रक्रिया सुरुदेखील झाली आहे.
ई केवायसी करण्यासाठी कोणती कागदपत्रे लागणार? (Ladki Bahin Yojana E kyc Required Documents)
लाडकी बहीण योजनेत ई-केवायसी करण्यासाठी तुम्हाला आधार कार्ड, रेशन कार्ड, उत्पन्नाचा दाखला ही कागदपत्रे लागणार आहे. याचसोबत तुम्हाला नाव, वय, पत्ता अशी सर्व माहिती भरावी लागणार आहे. अर्ज करताना तुम्ही जी कागदपत्रे अपलोड केली होती. तिच कागदपत्रे पुन्हा एकदा अपलोड करावी लागेल. यानंतर तुमची केवायसी प्रोसेस पूर्ण होणार आहे.
Ladki Bahin Yojana: पडताळणीसाठी लाडकी बहीण योजनेचे निकष बदलले का? आदिती तटकरेंनी दोन शब्दात विषय संपवला ई-केवायसी न केल्यास काय होणार?
जर लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांनी ई केवायसी केले नाही तर त्यांना फटका बसणार आहे. त्यांचा लाभ बंद केला जाणार आहे. ज्यांनी केवायसी केले नाही त्यांना दर महिन्याला मिळणार १५०० रुपये मिळणार नाहीत.