मुंबई:- राज्यातील पोलीस भरतीची (Maharashtra Police Bharti 2025) तयारी करणाऱ्या तरुणांसाठी एक अत्यंत महत्त्वाची आणि दिलासादायक बातमी आहे. महाराष्ट्र सरकारने पोलीस दलात सुमारे १५,६३१ पदांसाठी भरती जाहीर केली असून, या भरती प्रक्रियेला मंत्रिमंडळाने मान्यता दिली होती. दरम्यान, आता भरतीमध्ये सन 2022 पासून 2025 पर्यंत संबंधित पदाची विहित वयोमर्यादा ओलांडलेल्या उमेदवारांनाही आणखी एक वेळची संधी देण्यात येणार आहे. विशेष बाब म्हणून या भरती प्रक्रियेसाठी उमेदवारांना अर्ज करता येणार आहे आणि भरती प्रक्रियेत सहभागी होता येणार आहे. याबाबतचा शासन आदेश जाहीर करण्यात आला आहे.
शासन निर्णय PDF Download
गृह विभागाने १० सप्टेंबर २०२५ रोजी याबाबतचा शासन निर्णय जारी केला आहे. गेल्या काही वर्षांपासून पोलीस भरती प्रक्रिया रखडली असल्यामुळे अनेक तरुणांना वयोमर्यादेची अडचण येत होती. त्यामुळे, ही भरती त्यांच्यासाठी एक सुवर्णसंधी आहे.
🚨पोलीस व अन्य भरती बातम्या 2 🚔
ही भरती पोलीस शिपाई, पोलीस शिपाई चालक, बॅण्डस् मॅन, सशस्त्री पोलीस शिपाई, कारागृह शिपाई या पदांसाठी होणार असून, त्याची जाहिरात देखील प्रकाशित झाली आहे. आता या पोलिस भरती प्रक्रियेकरीता ज्यांची वयोमर्यादा संपली होती अशा सन 2022 ते 2025 पर्यंतच्या सर्व उमेदवारांना फॉर्म भरुन भरतीसाठी पात्र ठरविण्यात येणार आहे.
गेल्या 2-3 वर्षांपासून पोलीस भरती प्रक्रिया रखडली होती, ज्यामुळे विद्यार्थी आणि विविध संघटनांनी भरतीची मागणी केली होती. आता ही प्रक्रिया पुन्हा सुरू झाली असून, वयोमर्यादा ओलांडलेल्या उमेदवारांना विशेष संधी देण्यात आली आहे.
शासन परिपत्रकात काय म्हटले?
शासन निर्णयानुसार, सन 2022, 2023, 2024 आणि 2025 मध्ये संबंधित पदांसाठी कमाल वयोमर्यादा ओलांडलेल्या उमेदवारांना एक वेळची विशेष संधी म्हणून या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्यास पात्र ठरविण्यात येईल. हा निर्णय रखडलेल्या भरतीमुळे प्रभावित झालेल्या उमेदवारांसाठी दिलासादायक आहे. ही भरती प्रक्रिया महाराष्ट्र पोलीस दलाला बळकट करण्यासोबतच तरुणांना त्यांच्या स्वप्नांना साकार करण्याची संधी देणारी आहे. असं शासन परिपत्रकात म्हंटल आहे.