चंद्रपूर:- मराठा समाजाचा ओबीसीत समावेश करावा आणि आरक्षण देण्यात यावे अशी मागणी मनोज जरांगे पाटलांनी केली आहे. या विरोधात आता विदर्भात वातावरण तापायला सुरुवात झाली आहे.
चंद्रपुरात ओबीसी संघटनांनी आज एक मोठी बैठक घेत जरांगेंच्या प्रयत्नांना जोरदार विरोध करण्याचे ठरविले आहे. चंद्रपूर शहरातील गांधी चौकात उद्या 2 सप्टेंबर रोजी निदर्शने करण्यात येणार आहेत. तरी जास्तीत जास्त संख्येने नागरिकांनी उपस्थित राहावे असे ओबीसी संघटनांनी आवाहन केले आहे.