मुंबई:- राज्य पोलिस दलासह कारागृह विभागातील शिपाई संवर्गातील एकूण १५ हजार ६३१ रिक्त पदांवर होणाऱ्या भरतीकरीता घटकनिहाय प्रक्रिया राबविण्यासंदर्भात गृह विभागाने आदेश जारी केले आहेत. दिवाळीनंतर भरतीची शक्यता असून, सन २०२२ ते २०२५ या वर्षांत वयोमर्यादा ओलांडलेले उमेदवार एक अखेरची संधी म्हणून अर्जासाठी पात्र आहेत. त्यामुळे नियमित सराव करणाऱ्यांसह वय ओलांडणाऱ्यांनीही 'खाकीचे स्वप्न' पूर्ण करण्यासाठी कंबर कसण्यास सुरुवात केली आहे. यासह पोलिस घटकांनीही आगामी निवडणुकांसह सणोत्सवाचा आढावा घेत भरतीचे नियोजन हाती घेतले आहे.
🚨पोलीस व अन्य भरती बातम्या 2 🚔
वयोमर्यादा ओलांडलेल्या उमेदवारांना विशेष संधी:
गृह मंत्रालयाने राज्यात १५ हजार रिक्त पदांवर पोलिस भरतीची घोषणा केल्यानंतर सर्व पोलिस घटकांत भरती प्रक्रियेसंदर्भात हालचाली सुरू झाल्या आहेत. ही भरती पोलीस शिपाई, पोलीस शिपाई चालक, बॅण्डस् मॅन, सशस्त्री पोलीस शिपाई, कारागृह शिपाई या पदांसाठी होणार असून, त्याची जाहिरात देखील प्रकाशित झाली आहे. आता या पोलिस भरती प्रक्रियेकरीता ज्यांची वयोमर्यादा संपली होती अशा सन 2022 ते 2025 पर्यंतच्या सर्व उमेदवारांना फॉर्म भरुन भरतीसाठी पात्र ठरविण्यात येणार आहे. गेल्या 2-3 वर्षांपासून पोलीस भरती प्रक्रिया रखडली होती, ज्यामुळे विद्यार्थी आणि विविध संघटनांनी भरतीची मागणी केली होती. आता ही प्रक्रिया पुन्हा सुरू झाली असून, वयोमर्यादा ओलांडलेल्या उमेदवारांना विशेष संधी देण्यात आली आहे.
शासन परिपत्रकात काय म्हटले?
शासन निर्णयानुसार, सन 2022, 2023, 2024 आणि 2025 मध्ये संबंधित पदांसाठी कमाल वयोमर्यादा ओलांडलेल्या उमेदवारांना एक वेळची विशेष संधी म्हणून या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्यास पात्र ठरविण्यात येईल. हा निर्णय रखडलेल्या भरतीमुळे प्रभावित झालेल्या उमेदवारांसाठी दिलासादायक आहे. ही भरती प्रक्रिया महाराष्ट्र पोलीस दलाला बळकट करण्यासोबतच तरुणांना त्यांच्या स्वप्नांना साकार करण्याची संधी देणारी आहे. असं शासन परिपत्रकात म्हंटल आहे.
...अशी आहे भरतीप्रक्रिया:
उमेदवार एकापेक्षा जास्त अर्ज नोंदवू शकणार नाहीत
सर्व घटकांत एकाच दिवशी लेखी परीक्षा
प्रथम ५० गुणांची शारीरिक चाचणी
शारीरिक चाचणीनंतर एका पदास १० उमेदवारांची निवड
पात्र उमेदवारांची १०० गुणांची लेखी परीक्षा
गुणवत्ता यादी शारीरिक व लेखी परीक्षेनंतर कागदपत्र पडताळणीनंतर अंतिम निवड यादी
सर्व घटकांत एकाच दिवशी लेखी परीक्षा
प्रथम ५० गुणांची शारीरिक चाचणी
शारीरिक चाचणीनंतर एका पदास १० उमेदवारांची निवड
पात्र उमेदवारांची १०० गुणांची लेखी परीक्षा
गुणवत्ता यादी शारीरिक व लेखी परीक्षेनंतर कागदपत्र पडताळणीनंतर अंतिम निवड यादी
पोलीस भरती प्रक्रियेतील महत्त्वाचे टप्पे
1. सर्वप्रथम सरकारतर्फे पोलीस भरतीची घोषणा करण्यात येते
2. पोलीस भरतीची जाहिरात वर्तमानपत्रांमधून प्रकाशित केली जाते.
3. पात्र उमेदवारांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज आणि अर्जाची रक्कम भरावी लागते.
4. पात्र उमेदवारांना मैदानी परीक्षेसाठी बोलविण्यात येते.
5. मैदानी परिक्षेत उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांची लेखी परीक्षा घेतली जाते.
6. लेखी परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांच्या कागदपत्रांची पडताळणी केली जाते.
7. पात्र उमेदवारांची अंतिम यादी जाहीर केली जाते.
8. अंतिम यादीत समावेश झालेल्या उमेदवारांना पोलीस मुख्यालयात प्रमाणपत्र वाटप केले जाते.
9. महाराष्ट्रातील पोलीस प्रशिक्षण केंद्रांवर 9 महिने प्रशिक्षण दिलं जातं.
10. प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांना पुन्हा पोलीस मुख्यालयांमध्ये विविध विभागांमध्ये रुजू केलं जातं.
11. सुरक्षा देणं, विविध कार्यालयांची सुरक्षा, आरोपींना न्यायालयात नेणं, आरोपींना आरोग्य चाचणीसाठी नेणं, शस्त्रागाराची सुरक्षा यांसारखी कामे दिली जातात.
12. उमेदवारांच्या कौशल्यानुसार किंवा मधल्या काळात विशिष्ट परीक्षा उत्तीर्ण झाल्यास मुख्यालयातून त्यांची बदली फोर्स वन, जलद प्रतिसाद पथक, लोकल क्राईम ब्रांच, पासपोर्ट डिव्हिजन, डॉग स्क्वॉड, बॉम्ब डिस्पोजल पथकामध्ये केली जाते.