Maharashtra Police Recruitment 2025: १५,६३१ पदांची पोलीस भरती ७ ऑक्टोबरपासून सुरु होणार?

Bhairav Diwase
गृह विभागाकडून वेबसाईट वर काम सुरू आहे.... जी त्यात तारीख दिलेली आहे. त्या तारीख मध्ये बद्दल होणार आहेत....

मुंबई:- पोलीस भरतीचा एक मोठी अपडेट समोर आला आहे. राज्याच्या गृह विभागात सध्या पोलिसांची १५ हजार ६३१ पदे रिक्त असून दसऱ्या नंतर पदभरतीला ७ ऑक्टोबर २०२५ पासून सुरवात होणार असल्याचे समजते. या साठी एक नवीन पोर्टल आज २ ऑक्टोबर पासून कार्यान्वयीत झाले आहे. या नवीन पोर्टल उमेदवार ७ तारखेपासून अर्ज सादर करू शकतील असे समजते.

अजून या संदर्भात अधिकृत घोषणा केली नसली तरी पोर्टल वर अर्ज सुरु होण्याची तारीख ७ ऑक्टोबर २०२५ दिसत आहे. तसेच अर्ज करण्याची शेवटची तारीख ७ नोव्हेंबर २०२५ राहील असे समजते. परंतु या वेळापत्रकात बदल संभवतो.


उमेदवारांना एका पदासाठी एकच अर्ज करावा लागणार असून एकाच पदासाठी उमेदवार एकापेक्षा जास्त जिल्ह्यांमध्ये अर्ज करू शकणार नाही. एकाच पदासाठी अनेक जिल्ह्यांमध्ये अर्ज केले असतील तर एकच अर्ज पात्र ठरेल.

*पोलीस भरतीची वेबसाईट अपडेट होत आहे सर्वांनी याची नोंद घ्यावी...*