Surrender of Naxalism: भूपती सह 60 नक्षलवाद्यांनी शस्त्र टाकले अन् हाती घेतलं 'भारताचे संविधान'!

Bhairav Diwase

गडचिरोली:- गडचिरोलीत (Gadchiroli) माओवादी नेता मल्लोजुला वेणुगोपाल राव (Mallojula Venugopal Rao) याच्या मोठ्या आत्मसमर्पणानंतर माओवाद मुक्त महाराष्ट्रच्या शक्यतेला जोरदार बळ प्राप्त झाले आहे..

माओवाद्यांच्या (Naxal) सेंट्रल कमिटी तसेच पॉलिट ब्युरो सदस्य आणि अत्यंत वरिष्ठ नक्षल कमांडर मल्लोजुला वेणुगोपाल उर्फ सोनू उर्फ भूपती याने आपल्या 60 सहकाऱ्यां सह गडचिरोली पोलिसांसमोर (Gadchiroli Police) आत्मसर्मपण केले आहे, ज्यामुळे महाराष्ट्रातून सशस्त्र माओवाद लवकरच हद्दपार होण्याची शक्यता आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्याउपस्थितीतहा आत्मसमर्पण कार्यक्रम आजगडचिरोलीतपारपडतोय. यावेळी शरणागती पत्करणारे माओवादी त्यांचे शस्त्र मुख्यमंत्र्यांना सोपवत आहे आणि मुख्यमंत्री त्यांना संविधानाची प्रत सुपर्द केली आहे.