Chandrapur News: 'व्हॉईस ऑफ मीडिया'चा राज्यस्तरीय उत्कृष्ट जिल्हाध्यक्ष पुरस्कार चंद्रपूरचे जितेंद्र जोगड यांना जाहीर

Bhairav Diwase

चंद्रपूर:- ‘व्हॉईस ऑफ मीडिया’ आणि ‘व्ही.ओ.एम. इंटरनॅशनल फोरम’ या आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटनेतर्फे दिले जाणारे उत्कृष्ट जिल्हाध्यक्ष पुरस्कार २०२५ जाहीर झाले असून, चंद्रपूर जिल्हा साप्ताहिक विंगचे अध्यक्ष मा. श्री. जितेंद्र जोगड यांना राज्यस्तरीय उत्कृष्ट जिल्हाध्यक्ष पुरस्कारासाठी निवड झाली आहे.


हा सन्मान १५ आणि १६ नोव्हेंबर रोजी पंढरपूर येथील इस्कॉन सभागृहात होणाऱ्या राज्य शिखर अधिवेशनात प्रदान करण्यात येणार आहे.
या अधिवेशनात जगभरातील पत्रकारांचा सहभाग अपेक्षित आहे.


संघटनेचे मुख्य संयोजक गोरक्षनाथ मदने यांनी पत्रकार परिषदेत याची माहिती दिली. ‘व्हॉईस ऑफ मीडिया’ या संघटनेचे ५६ देशांमध्ये कार्यरत नेटवर्क असून, तब्बल ४.७ लाख पत्रकार सदस्यांचा सहभाग आहे.


या पुरस्कार प्रक्रियेत जिल्हा व तालुका स्तरावरील कार्याचा सखोल आढावा घेऊन सन्मानितांची निवड करण्यात आली आहे.
विंगनिहाय निवड झालेल्या पदाधिकाऱ्यांमध्ये —
👉 साप्ताहिक विंग : जितेंद्र जोगड (चंद्रपूर)
👉 महिला विंग : लक्ष्मी वाडेकर (बुलढाणा)
👉 रेडिओ विंग : अनुप फुसके (सातारा)
👉 डिजिटल विंग : वसंत खडसे (वाशीम)


या निवड प्रक्रियेत अजित कुंकुलोळ, कुमार कडलग, नरेंद्र देशमुख, अमोल मतकर, मिलिंद टोके, बापूराव पाटील, किशोर करंजेकर, वैशाली पाटील, रश्मी मारवाडी आणि किरण ठाकरे यांनी सक्रिय सहभाग नोंदवला.


संघटनेचे प्रदेशाध्यक्ष अनिल म्हस्के, महासचिव दिगंबर महाले, कार्याध्यक्ष विजय चोरडिया, मंगेश खाटीक, राज्य उपाध्यक्ष संजय पडोले, महिला विंग प्रदेशाध्यक्ष रश्मी मारवाडी, रेडिओ विंग प्रदेशाध्यक्ष इर्षाद शेख, साप्ताहिक विंग प्रदेशाध्यक्ष वामन पाठक आणि अब्दुल कईम यांनी चंद्रपूर जिल्ह्याचे साप्ताहिक विंग अध्यक्ष जितेंद्र जोगड यांच्या उल्लेखनीय जिल्हाध्यक्ष कार्याचे मनापासून कौतुक करून त्यांचे अभिनंदन केले.