कोरपना:- कोरपना तालुक्यातील बोरी नवेगाव येथे एक अत्यंत धक्कादायक आणि मन हेलावून टाकणारी घटना समोर आली आहे. प्रशासनाच्या उदासीनतेमुळे आणि रस्त्याच्या वादातून निर्माण झालेल्या मानसिक त्रासाला कंटाळून एका हतबल शेतकऱ्याने आपल्या दहा एकरांतील सोयाबीन पिकाला आग लावून दिली आहे. Chandrapur police
चंद्रपूर जिल्ह्यातील कोरपना तालुक्यातील बोरी नवेगाव येथील ही दुर्दैवी घटना आहे. कोंडू आत्राम नामक या शेतकऱ्याचा शेताकडे जाणारा पारंपरिक वहिवाटीचा रस्ता समोरच्या शेतकऱ्यांनी गेल्या हंगामापासून मुद्दामहून अडवून ठेवला होता. Chandrapur fire News
रस्ता अडवल्यामुळे, काढणी केलेले सोयाबीन पीक शेतातून बाहेर काढणे, त्याची मळणी करणे अशक्य झाले होते. दोन महिन्यांपासून कोंडू आत्राम यांनी ग्रामपंचायत, महसूल विभाग आणि स्थानिक प्रशासनाकडे वारंवार तक्रारी केल्या, रस्त्याची मागणी केली. मात्र, प्रशासनाने यावर कोणतीही ठोस कारवाई केली नाही. Chandrapur News
परिणामी, काढलेले सोयाबीन पीक शेतातच पडून राहिले, हवामानामुळे ते कुजण्याची वेळ आली. लाखोंचे पीक डोळ्यासमोर वाया जात असताना, आत्राम यांची आर्थिक आणि मानसिक स्थिती अधिकच बिघडत गेली. Korpana
शेवटी, हताश झालेल्या कोंडू आत्राम यांनी टोकाचे पाऊल उचलत स्वतःच्या १० एकरातील सोयाबीन पिकाला पेटवून दिले. या घटनेत त्यांना लाखो रुपयांचे मोठे नुकसान झाले आहे. या घटनेचे व्हिडीओ आणि फोटो सोशल मीडियावर तीव्र संताप व्यक्त करत व्हायरल होत आहेत. Fire News
वहिवाटीचा रस्ता अडवणे कायद्याने चुकीचे असतानाही प्रशासनाने कारवाई न केल्याने, दोषींना पाठीशी घालण्याचा आरोप होत आहे. या घटनेनंतर तरी महसूल विभाग जळालेल्या पिकाचा पंचनामा करून या शेतकऱ्याला न्याय मिळवून देणार का, हा मोठा प्रश्न आता उपस्थित झाला आहे. या घटनेवर आमचे लक्ष असेल. Korpana News
"मी कुणाकडे न्याय मागायचा? रस्ता अडला म्हणून पीक वाचवू शकलो नाही. प्रशासनाकडे गेलो, पण कुणालाच काही पडले नव्हते!"
शेतकरी कोंडू आत्राम


