Police Bharati: पोलिस भरतीचा उत्साह! चंद्रपुरातील तरुणाईचा मैदानावर जोरदार सराव

Bhairav Diwase

चंद्रपूर:- पोलीस भरतीची जाहिरात प्रसिद्ध झाली आहे. महाराष्ट्रात एकूण 15,631 पदांसाठी भरती होणार आहे. यात चंद्रपूर जिल्ह्यात 215 पोलीस शिपाई पदांसाठी भरती होणार असून फॉर्म भरण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे. अश्यातच चंद्रपूर जिल्ह्यातील तरुण-तरुणींमध्ये एक अभूतपूर्व उत्साह पाहायला मिळत आहे. कुटुंबाला हातभार लावण्यासाठी आणि सरकारी नोकरी मिळवण्याच्या महत्त्वाकांक्षेने ही युवा पिढी मैदानावर घाम गाळत आहे. Chandrapur police 



पहाटेच्या धुक्यात आणि सकाळच्या शीतल वातावरणात... हे दृष्य आहे चंद्रपूर शहराचे. पोलीस भरतीसाठी उत्सुक असलेल्या उमेदवारांनी आपला सराव सुरू केला आहे. ग्रामीण आणि शहरी भागातील हजारो युवक-युवती पहाटेपासूनच शारीरिक आणि मैदानी चाचणीचा जोरदार सराव करताना दिसत आहेत. Police Bharati 2025

अनेकांचा ओढा हा पोलीस भरतीकडे लागलेला आहे. यातील कित्येक मुले-मुली कुटुंबाला मदत करण्यासाठी शेतीत काम करतात किंवा शहरात दुकानांमध्ये मजुरी करतात. स्वतः कष्ट करून मुलांना चांगले शिक्षण देणाऱ्या पालकांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी ही युवा पिढी जिद्दीने लढत आहे. Chandrapur Police Bharati 


आज अनेक पदवीधर असूनही सरकारी नोकरी मिळत नसल्याने सुशिक्षित तरुण हाताला मिळेल ते काम करताना दिसत आहेत. अशावेळी, ग्रामीण भागातील युवकांनी बारावी होताच अकॅडमीमध्ये नाव नोंदवून पोलीस भरतीचा सराव सुरू केला आणि यश संपादन केल्याची उदाहरणे या युवा पिढीला प्रेरणा देत आहेत. District Sports Complex, Chandrapur 


भरतीत अपयश आलेले काही तरुण नव्या उमेदीने पुन्हा मैदानात उतरले आहेत. त्यांना योग्य मार्गदर्शनाची नितांत गरज आहे, आणि यशस्वी झालेले तरुण-तरुणी स्वतःच्या अनुभवांनी त्यांना मोलाची प्रेरणा देत आहेत. एकंदरीत, चंद्रपुरातील जिल्हा स्टेडियम असो वा रामबाग मैदान... सर्वत्र तरुणाईच्या उत्साहाचे आणि तयारीचे वातावरण आहे. Chandrapur News 

चंद्रपूरची ही युवा पिढी केवळ सरकारी नोकरीसाठी नाही, तर आपल्या कुटुंबाला आणि देशाला सेवा देण्यासाठी सज्ज होत आहे. Maharashtra Police