
चंद्रपूर:- महाराष्ट्र पोलीस दलात १५,६३१ जागांसाठी भरती प्रक्रिया सुरू झाली असून गेल्या २९ ऑक्टोबरपासून अर्ज घेण्यात येत आहे. या भरतीमध्ये शिपाई, चालक, बँडस्मन, कारागृह शिपाई आणि एसआरपीएफ या विविध पदांचा समावेश आहे.
१५,६३१ पदांसाठी भरती:
गेल्या २९ ऑक्टोबरपासून सुरू झालेल्या या भरती प्रक्रियेत पोलीस शिपाई, चालक, बँडस्मन, कारागृह शिपाई आणि एसआरपीएफ अशा विविध १५,६३१ जागांसाठी अर्ज मागवण्यात येत आहेत.
अर्ज करण्याची अंतिम तारीख:
जिल्हा पोलीस दलाच्या वतीने सर्व इच्छुक उमेदवारांना आवाहन करण्यात आले आहे की, अर्ज करण्यासाठी आता केवळ काहीच दिवस शिल्लक आहेत. अर्ज भरण्यासाठी अंतिम क्षणाची वाट न पाहता उमेदवारांनी आपली सर्व आवश्यक माहिती भरून, विहित मुदतीपूर्वी ऑनलाईन अर्ज सादर करावेत. अंतिम तारीख ३० नोव्हेंबर २०२५ आहे.
अर्ज कुठे कराल?
अर्ज करण्यासाठी, उमेदवारांनी महाराष्ट्र सरकारच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी:
या महत्त्वपूर्ण संधीचा लाभ घेण्यासाठी पात्र उमेदवारांनी ३० नोव्हेंबरपूर्वी आपले अर्ज नक्की भरावेत.

