Gadchiroli News: राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटातील महिला नेत्याचा अपघाती मृत्यू

Bhairav Diwase
गडचिरोली:- गडचिरोली जिल्ह्यातील राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात खळबळ उडवणारी बातमी समोर येत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटातील महिला नेत्याचा भीषण अपघातात मृत्यू झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी रात्री उशिरा ही अपघाताची घटना घडली असल्याची माहिती आहे. पोलिसांनी या घटनेचा पंचनामा केला असून, पुढील तपास पोलिसांकडून सुरू आहे. या घटनेनंतर गडचिरोलीत हळहळ व्यक्त केली जात आहे.


राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटातील महिला प्रदेश उपाध्यक्ष गीताताई हिंगे यांच्या वाहनाचा पाचगाव येथे भीषण अपघात झाला. मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी त्या कामानिमित्त नागपूरला गेल्या होत्या. रात्री त्या नागपूरहून गडचिरोलीच्या दिशेनं परतत होते. दरम्यान, पाचगाव परिसरात त्यांच्या कारला विरूद्ध दिशेनं येणाऱ्या कारला जोरदार धडक दिली. धडक प्रचंड भीषण होती. या धडकेत गीताताई हिंगे यांचा जागीच मृत्यू झाला.


या अपघातात गीताताई हिंगे यांच्या पतींना गंभीर दुखापत झाली असल्याची माहिती समोर आली आहे. अपघात घडल्यानंतर स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेतली. तसेच पोलिसांना याची माहिती दिली. दोघांना तातडीने रूग्णालयात दाखल करण्यात आले. सध्या गीताताई हिंगे यांच्या पतीवर खासगी रूग्णालयात उपचार सुरू आहेत.


दरम्यान, पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत पंचनामा केला. हा अपघात नेमका घडला कसा? याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे. गीताताई हिंगे यांच्या अचानक जाण्याने गडचिरोली जिल्ह्यात हळहळ व्यक्त केली जात आहे. तसेच विविध पक्षातील नेत्यांनी त्यांच्या निधनाबद्दल दु:ख व्यक्त केला आहे.