India T20 World Cup 2026 Squad Announce : ट्वेंटी-२० वर्ल्ड कपसाठी भारतीय संघाची घोषणा

Bhairav Diwase

पुढच्या वर्षी भारत व श्रीलंका यांच्या संयुक्त विद्यमाने होणाऱ्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेसाठी भारतीय संघाची घोषणा आज करण्यात आली. निवड समिती प्रमुख अजित आगरकर ( Ajit Agarkar) व कर्णधार सूर्यकुमार यादव ( Suryakumar Yadav) यांच्या उपस्थितीत मुंबईतील बीसीसीआय मुख्यालयात ही घोषणा केली गेली. अपेक्षेप्रमाणे भारताच्या ट्वेंटी-२० संघात फार बदल पाहायला मिळाले नाहीत. सूर्या व उप कर्णधार शुभमन गिल ( Shubman Gill) यांच्या फॉर्मवरून टीम इंडिया चिंतीत होती आणि निवड समितीने धाडसी निर्णय घेतला. गिलला संघातून वगळले.

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पाच सामन्यांच्या ट्वेंटी-२० मालिकेत खेळलेलाच संघ वर्ल्ड कपमध्ये असेल हे निश्चित होते. फक्त शुभमन व सूर्या यांच्या फॉर्मने डोकेदुखी वाढवली होती. भारताचा माजी खेळाडू आकाश चोप्रा याने शुभमनच्या जागी हार्दिक पांड्याची उप कर्णधार म्हणून घोषणा केल्यास आश्चर्य वाटायला नको, असे विधान केले होते. पण, निवड समितीने संघात बदल करण्याचे टाळले. शुभमनने २०२५ मध्ये १५ सामन्यांत २४.२५ च्या सरासरीने २९१ धावा केल्या आहेत, तर सूर्याने २१ सामन्यांत १३.६२ च्या सरासरीने २१८ धावा केल्या आहेत. शुभमनला वगळून अक्षर पटेलकडे उप कर्णधारपद दिले गेले आहे.


संजू सॅमसन ( Sanju Samson) याने संघात स्थान टिकवले असले तरी त्याच्यासमोर इशान किशनचे ( ishan kishan) आव्हान असणार आहे. त्याने सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीत १० सामन्यांत ५१७ धावा केल्या आहेत. तो यष्टिरक्षक म्हणून पहिला पर्याय असेल... तिलक वर्मा, हार्दिक पांड्या, वॉशिंग्टन सुंदर, शिवम दुबे व अक्षर पटेल हे अष्टपैलू खेळाडू संघात आहेत. जसप्रीत बुमराह व अर्शदीप सिंग हे जलदगती गोलंदाजाचे नेतृत्व करतील. हर्षित राणा हा तिसरा पर्याय संघात आहे. कुलदीप यादव व वरुण चक्रवर्थी हे दोन फिरकीपटू संघात आहेत.

India T20 World Cup 2026 Group Stage Schedule:

७ फेब्रुवारी २०२६ - भारत विरुद्ध अमेरिका, वानखेडे स्टेडियम, मुंबई

१२ फेब्रुवारी २०२६ - भारत विरुद्ध नामिबाया, अरुण जेटली स्टेडियम, दिल्ली

१५ फेब्रुवारी २०२६ - भारत विरुद्ध पाकिस्तान, आर प्रेमदासा स्टेडियम, कोलंबो

१८ फेब्रवारी २०२६ - भारत विरुद्ध नेदरलँड्स, नरेंद्र मोदी स्टेडियम, अहमदाबाद

India Squad for T20I World Cup :
 
सूर्यकुमार यादव ( कर्णधार), अभिषेक शर्मा, तिलक वर्मा, अक्षर पटेल ( उप कर्णधार) , रिंकू सिंग, हार्दिक पांड्या, शिवम दुबे, संजू सॅमसन ( यष्टीरक्षक), इशान किशन ( यष्टिरक्षक), वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव, वरुण चक्रवर्थी, जसप्रीत बुमराह, अर्शदीप सिंग, हर्षित राणा.