भाजपा नेते सुधीर मुनगंटीवारांचं वडेट्टीवारांना प्रत्युत्तर
चंद्रपूर:- महापालिकेच्या निवडणुकीचा प्रचारात सध्या जोरात सुरू आहे. आरोपांच्या फैरी सर्वत्र सुरू आहेत. सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांवर आरोप करण्याची एकही संधी सोडताना दिसत नाही.
महापालिका निवडणुकीच्या प्रचारात चंद्रपूर जिल्ह्यातील भाजपच्या दोन नेत्यांमध्ये उफाळून आलेल्या गटबाजीवर काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते विजय वडेट्टीवार यांनी नेमके बोट ठेवले. हा वाद विकोपाला गेल्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांना `सुधीर कमळ बघ, किशोर कमळ बघ', असे सांगावे लागत असल्याचा टोला त्यांनी लागावला.
वडेट्टीवारांच्या या विधानानंतर सुधीर मुनगंटीवार यांनीही आपल्या खास शैलीत उत्तर दिले आहे. काँग्रेस नेत्यांना धन्यवाद' त्यांनी कॉंगेसच्या राज्यात ज्या कमळाला राष्ट्रीय फुल म्हणून मान्यता दिली.

