चंद्रपूर:- ०३ जानेवारी २०२६ रोजी, प्रहार जनशक्ती पार्टीच्या वतीने विविध मागण्यांसाठी नागभीडमध्ये भव्य आंदोलनाचे आयोजन करण्यात आले आहे. या आंदोलनामुळे नागभीड-वडसा मार्गावरील वाहतूक विस्कळीत होण्याची शक्यता असल्याने पोलीस प्रशासनाने वाहतुकीत मोठे बदल केले आहेत.
उद्या सकाळी १०:०० ते सायंकाळी ५:०० या वेळेत हे आंदोलन पार पडणार आहे. जिल्ह्यातून आणि जिल्ह्याबाहेरून मोठ्या संख्येने नागरिक या आंदोलनात सहभागी होणार असल्याने कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी नागभीड ते वडसा (गडचिरोली) मार्ग सर्व प्रकारच्या वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात येणार आहे. विशेषतः जड वाहनांना या मार्गावर प्रवेश बंदी असेल.
प्रवाशांसाठी महत्त्वाचे पर्यायी मार्ग खालीलप्रमाणे असतील:
नागपूर/भंडारा ते नागभिड मार्गे वडसा/गडचिरोली::: निलजफाटा - पवनी - लाखांदूर - वडसा मार्गे प्रवास करावा.
वरोरा/चिमूर/भीसी ते नागभिड मार्गे गडचिरोली/वडसा::: शंकरपूर - नेरी - सिंदेवाही - मुल - सावली या मार्गाचा अवलंब करावा.
चंद्रपूर/मुल /सावली ते नागभिड मार्गे वडसा/गडचिरोली::: थेट मुल - सावली मार्गाचा वापर करावा.
चंद्रपूर/मुल/सिंदेवाही ते नागभिड मार्गे नागपूर::: सिंदेवाही - नेरी - शंकरपूर - काम्पा मार्गे प्रवास करावा.
पोलीस प्रशासनाने सर्व नागरिकांना आणि वाहनधारकांना विनंती केली आहे की, त्यांनी अत्यावश्यक कामाशिवाय या मार्गाचा वापर टाळावा आणि पर्यायी मार्गांचा वापर करून प्रशासनाला सहकार्य करावे. आंदोलनामुळे होणारी गैरसोय टाळण्यासाठी प्रवाशांनी आपले नियोजन आधीच करावे.

