Kishor jorgewar: काम बोलतं आहे, म्हणून भाजप पुढे आहे!

Bhairav Diwase
चंद्रपूर:- प्रभाग क्रमांक १७, बाबूपेठ येथील रमेश लिंगय्या पुलीपाका, राजू बारीकराव तोडासे आणि प्रतिमा धरमसिंह ठाकूर यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.


बाबूपेठ प्रभागातील नागरिकांना घरपट्टे संदर्भात दिलेला संकल्प पूर्णत्वास येत आहे. बाबूपेठ हा प्रामुख्याने सेवेकरी व कष्टकरी नागरिकांचा परिसर असून येथे मोठ्या प्रमाणात मध्यमवर्गीय कुटुंबे वास्तव्यास आहेत. त्यामुळे या प्रभागाकडे विशेष लक्ष देणे हे माझे कायमचे प्राधान्य राहिले आहे. असे आमदार किशोर जोरगेवार यांनी म्हटले.


कष्टकरी नागरिकांना न्याय देण्याची भूमिका भारतीय जनता पार्टीची नेहमीच ठाम राहिली आहे. याच विश्वासाच्या बळावर यंदा येथील चारही उमेदवारांना नागरिक प्रचंड बहुमताने निवडून देतील, असा मला ठाम विश्वास आहे. बाबूपेठच्या सर्वांगीण विकासासाठी मी कटिबद्ध आहे.


या प्रचार सभेला शिवसेना (शिंदे गट) चे विदर्भ संघटक किरण पांडव, युवराज धानोरकर तसेच माजी आमदार संजय बत्कुलवार यांची प्रमुख उपस्थिती होती.