Maoist killed : माओवादी कारवायांचा मास्टरमाइंड 'तुफान'सह १६ जण ठार

Bhairav Diwase

गडचिरोली:- झारखंडमधील माओवादी कारवायांचा मास्टरमाइंड व केंद्रीय समिती सदस्य अनल ऊर्फ तुफान ऊर्फ पतिराम मांझी याच्यासह १६ माओवाद्यांना ठार करण्यात गुरुवारी सुरक्षा दलाला यश आले. त्यात पाच महिलांचाही समावेश आहे. १५ मृतदेहांपैकी ११ जणांची ओळख पटली असून उर्वरित चार जणांची ओळख पटवण्याचे काम सुरू आहे. त्याच्यावर तब्बल २.३५ कोटीचे इनाम होते. कोब्रा कमांडोंनी सारंडाच्या घनदाट जंगलात त्याला अचूकपणे टिपले, त्यामुळे माओवाद्यांना मोठा धक्का बसला आहे.

अनल ऊर्फ तुफान ऊर्फ पतीराम मांझी हा झारखंडच्या झरहाबाले (जि. गिरीडीह) येथील रहिवासी होता. तो साथीदारांसह सारंडाच्या जंगलात मोठी बैठक घेणार असल्याची 'टीप' सुरक्षा दलांना मिळाली होती. आयजी साकेत सिंह यांच्या मार्गदर्शनाखाली कोब्रा २०३, २०५ आणि २०९च्या जवानांनी जंगलात सापळा रचला, यावेळी माओवाद्यांना पळायलाही जागा उरली नाही. घनदाट जंगलात झालेल्या या चकमकीत कोब्रा जवानांनी आपल्या अचूक निशाण्याने नक्षलवाद्यांचे कंबरडेच मोडले. १२ माओवाद्यांचे मृतदेह आढळून आले