Chandrapur News: चंद्रपुर जिल्ह्यात बिबट्याचा थरार! एकाच दिवसात ६ शेतकऱ्यांवर हल्ला

Bhairav Diwase

चंद्रपूर:- चंद्रपूर जिल्ह्यात पुन्हा एकदा बिबट्याच्या हल्ल्याने खळबळ उडाली आहे. ब्रह्मपुरी तालुक्यातील चिखलगाव आणि पिंपळगाव भोसले या दोन गावांमध्ये बिबट्याने सलग हल्ले चढवत सहा शेतकऱ्यांना गंभीर जखमी केलं आहे.

ही घटना काल दुपारच्या सुमारास घडली. वैनगंगा नदीकाठी असलेल्या शेतात शेतकरी नेहमीप्रमाणे कामात व्यस्त असताना, दबा धरून बसलेल्या बिबट्याने अचानक झडप घातली. या हल्ल्यात जखमी झालेल्या सहा जणांमध्ये तीन महिलांचाही समावेश आहे. जखमींना तातडीने ब्रह्मपुरी ग्रामीण रुग्णालय आणि गडचिरोली जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी हलवण्यात आलं आहे.


घटनेची माहिती मिळताच वनविभागाचे पथक घटनास्थळी दाखल झाले असून, बिबट्याचा माग काढण्यासाठी परिसरात ट्रॅप कॅमेरे लावण्यात आले आहेत. बिबट्या अजूनही परिसरातच असण्याची शक्यता असल्याने गावकरी दहशतीत आहेत.