चक्क केले जाते बेकायदेशीर
हस्तांतरण....!
रोखठोक
**********
महेश पानसे.
चंद्रपूर:- ( राहुल थोरात ) शासनाच्या डोळयात मिरची फेकून वा काही सरकारी दलालांच्या तोंडात तुप भरवून शहरालगतच्या सरकारी जागांवर बेकायदेशीर जागांवर कब्जा करायचा व नंतर या जमिनी लाखो रूपयात साध्या 100 च्या स्टॅम्प पेपरवर कब्जा सोड पत्र देऊन विकायचा धंदा करणारी भू- माफिया मंडळी "चिटींग" करीत असल्याच्या चर्चा नविन नाहीत. मात्र आता चक्क सरकारी वनजमिनींवर लाखोंची रोकड उकलणाऱ्या माफियांचे बेकायदेशीर वतॅन गंभीर तर आहेच तेवढेच वन व महसूल विभागाच्या आंधळेपणा वर शिक्कामोर्तब करणारे ठरणारे आहे.
मूल नगर परिषद परीसरात सभोवतालच्या अनेक गावांचे हक्क नोंद असणारी वनजमिनी आहेत. सात बारा व गाव नमुना बारांवर शासनदरबारी तशा नोंदी आहेत. अथाॅतच महसूल व वन विभागाकडे अशा वनजमिनींचे रेकॉर्ड असतातच. वनजमिनींचे बाबतीत वन विभाग दक्ष तेवढाच गंभीर असणे अपेक्षित असतोच. मात्र मूल शहरालगत ताडाळा रोडवर असलेल्या एका वनजमिनींचा 100 रुपयाचे स्टॅम्प वर परस्पर कब्जा सोड व्यवहार झाल्याची बाब पुढे आल्याने अशा अनेक बेकायदेशीर व गंभीर व्यवहारांचा छडा लावण्याचा मार्ग मोकळा होऊ शकेल.
मौल्यवान वनजमिनींचे बेकायदेशीर हस्तांतरणाचे गैरकुत्य अनेक भू-माफियांना कोठडीत धाडणारे आहे. फक्त वनविभागाने गंभीर होऊन
महसूल विभागाच्या सोबतीने मोहीम राबवायला हवी. चंद्रपूर जिल्ह्या बहुतांश वनजमिन व्याप्त आहे. नगर परिषद, नगर पंचायत क्षेत्रालगत बहुमूल्य वनजमिनींचे क्षेत्र विखुरले आहे.
अशा खुल्या वनजमिनींवर सदर माफिया थातूर मातूर कब्जा करतात व काही काळानंतर लाखो रूपयात बेकायदेशीर रित्या साध्या स्टॅम्प वर कब्जा सोड लेख लिहून मोकळे होतात. राष्ट्रीय संपत्तीचे हनन तर होतेच सोबत इतरांची फसवणूक केली जाते. मूल शहरालगतचे सदर प्रकरण अतिशय गंभीर असून संपूर्ण जिल्ह्यातील अशा गैरकुत्यांना वाचा फोडणारे ठरेल व माफिया भुईसपाट होणे अपेक्षित ठरते.


