Chandrapur Congress: काँग्रेसच्या २७ पैकी १६ नगरसेवकांचा ताफा नागपुरात दाखल; विभागीय आयुक्तांना दिले निवेदन

Bhairav Diwase
चंद्रपूर:- चंद्रपूर महानगरपालिकेतील काँग्रेसमधील अंतर्गत गटबाजी आता उघड संघर्षाच्या वळणावर आली आहे. काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार आणि खासदार प्रतिभा धानोरकर यांच्यातील 'शह-काटशहाचे' राजकारण थेट नागपूरच्या विभागीय आयुक्त कार्यालयात पोहोचले आहे. वडेट्टीवार गटाचे महापालिकेतील विद्यमान गटनेते राजेश अड्डूर यांना पदावरून हटवण्यासाठी धानोरकर गटाने पूर्ण ताकद पणाला लावली आहे.

चंद्रपूर महापालिकेत एकूण २७ काँग्रेस नगरसेवकांपैकी तब्बल १६ नगरसेवक आज नागपूरकडे रवाना झाले. खासदार धानोरकर समर्थक असलेले हे १६ नगरसेवक थेट विभागीय आयुक्तालयात हजर झाले आणि त्यांनी गटनेता बदलण्याबाबत आयुक्तांना निवेदन दिले. गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या अंतर्गत धुसफुशीला आता कमालीचा वेग आलाय.