फटाके फोडून आणि ढोल-ताशांच्या तालावर साजरा केला आनंद!
चंद्रपूर:- केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला असून, याचे पडसाद आता संपूर्ण देशभरात उमटू लागले आहेत. या राजीनाम्याची बातमी समजताच चंद्रपूर शहरात विद्यार्थी आणि नागरिकांनी एकत्र येत प्रचंड जल्लोष साजरा केला.
गेल्या काही दिवसांपासून देशातील विविध परीक्षांमध्ये झालेल्या गोंधळामुळे आणि विद्यार्थ्यांच्या वाढत्या असंतोषामुळे केंद्रीय शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी जोर धरत होती. अखेर Dharmendra Pradhan यांनी राजीनामा दिल्यानंतर चंद्रपुरात आनंदाचे वातावरण पाहायला मिळाले. चंद्रपुरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ चौकात नागरिकांनी आणि विद्यार्थ्यांनी एकत्र येत बँडच्या तालावर ताल धरला, फटाक्यांची आतषबाजी केली
हा विजय केवळ कुठल्या एका पक्षाचा किंवा संघटनेचा नाही, तर हा भारतीय लोकशाहीचा आणि या देशातील तमाम विद्यार्थ्यांचा विजय आहे. विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना लोकशाहीत झुकवावेच लागते, हे आज पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे.
अनिल डहाके
सामाजिक कार्यकर्ता

