Snakebite while working in the field: शेतात काम करताना सर्पदंश; युवा शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू

Bhairav Diwase

जिवती:- तालुक्यातील संगणापूर येथील २२ वर्षीय युवा शेतकरी शुभम बाबाराव पोले यांचा शेतात काम करत असताना सर्पदंश झाल्याने दुर्दैवी मृत्यू झाला. रविवारी सकाळी घडलेल्या या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.



रविवारी सकाळी सुमारे ६ वाजताच्या सुमारास शुभम नेहमीप्रमाणे आपल्या शेतात शेतीची कामे करत होता. त्याचवेळी विषारी सापाने त्यांना दंश केला. ही बाब लक्षात येताच कुटुंबीयांनी आणि ग्रामस्थांनी त्यांना तातडीने गडचांदूर येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचार केल्यानंतर प्रकृती गंभीर असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी चंद्रपूर येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात रेफर करण्यात आले.


मात्र, उपचार सुरू असतानाच त्यांची प्राणज्योत मालवली. शुभम पोले हे मेहनती, कष्टाळू आणि होतकरू युवा शेतकरी म्हणून परिसरात परिचित होते. त्यांच्या अकाली निधनाने संगणापूर गावासह परिसरात शोककळा पसरली आहे.