चंद्रपूर:- भारतीय हवामान विभागाच्या मुंबई वेधशाळेने पुढील पाच दिवसांचा जिल्हानिहाय हवामान अंदाज जाहीर केला आहे. या अंदाजानुसार राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये मेघगर्जनेसह पाऊस आणि वादळी हवामानाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
२८ ऑक्टोबर रोजी गडचिरोली जिल्ह्यासाठी ऑरेंज अलर्ट, तर नंदुरबार, कोल्हापूर, नांदेड, हिंगोली, अमरावती, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया आणि चंद्रपूर यांसह काही जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट दर्शवण्यात आला आहे.
२९ ऑक्टोबर रोजी नंदुरबार, धुळे, नाशिक, पुणे, रायगड, सातारा, रत्नागिरी, जालना, अमरावती, नागपूर, भंडारा, गोंदिया आणि चंद्रपूर यांसह काही जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट देण्यात आला आहे.
३० ऑक्टोबर रोजी नाशिक घाट परिसर, नाशिक आणि अहिल्यानगर या भागांसाठी यलो अलर्ट दर्शवण्यात आला आहे.
मात्र, ३१ ऑक्टोबर आणि १ नोव्हेंबर रोजी सर्व जिल्ह्यांसाठी कोणताही विशेष हवामान अलर्ट दर्शवण्यात आलेला नाही.
नागरिकांनी हवामानातील बदलांवर लक्ष ठेवावे. मेघगर्जना किंवा वीज पडण्याची शक्यता असल्यास मोकळ्या जागेत थांबणे टाळावे आणि सुरक्षित ठिकाणी आश्रय घ्यावा. शेतकरी बांधवांनीही स्थानिक हवामानाचा अंदाज लक्षात घेऊन शेतीची कामे नियोजित करावीत.

