Tiger Attack : वाघाचा हल्ला! शेतालगतच्या जंगलात गेलेल्या ५५ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू

Bhairav Diwase

चिमूर:- चंद्रपूर जिल्ह्यात मानव-वन्यजीव संघर्ष पुन्हा एकदा उफाळून आला असून, चिमूर वनपरिक्षेत्रात वाघाच्या हल्ल्यात एका ५५ वर्षीय व्यक्तीचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. सदाशिव चिरकटा खडसंग (वय ५५, रा. गरडापार) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. ही घटना आज, शुक्रवार दिनांक ३० ऑक्टोबर २०२६ रोजी दुपारी १:३० वाजताच्या सुमारास घडली.

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, सदाशिव खडसंग हे आपल्या शेताला लागून असलेल्या जंगल परिसरात शौचास गेले होते. याचदरम्यान दबा धरून बसलेल्या वाघाने त्यांच्यावर हल्ला केला. या हल्ल्यात वाघाने त्यांना ठार केले.

घटनेची माहिती मिळताच वनविभागाला कळविण्यात आले. ही घटना चिमूर उपक्षेत्रातील गदगाव नियतक्षेत्रात घडली असून, ब्रह्मपुरी वनविभागांतर्गत येणाऱ्या या परिसरात वाघाच्या हल्ल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.