Bhairav Diwase. Aug 29, 2020
(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) स्वप्निल मंडोगडे डोंगरहळदी तुकुम, पोंभुर्णा
पोंभुर्णा:- चिंतामणी कॉलेज ऑफ सायन्स पोंभूर्णा येथे हॉकीचे जादूगर मेजर ध्यानचंद यांची जयंती २९ ऑगस्ट २०२० रोज शनिवारला राष्ट्रीय क्रीडा दिन म्हणून महाविद्यालयात साजरी करण्यात आली. "फिट इंडिया" या कार्यक्रमाच्या अंतर्गत "न्यु इंडिया फिट इंडिया" या संकल्पनेवर आधारित या कार्यक्रमात महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर सुधीर हुंगे सर, त्याचप्रमाणे शारीरिक निदेशक प्राध्यापक संतोष कुमार शर्मा सर, प्राध्यापक संघपाल नारनवरे सर आणि महाविद्यालयातील कर्मचारी उपस्थित होते. या कार्यक्रमाप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुधीर हुंगे सर यांनी मेजर ध्यानचंद यांच्या जीवन कार्यावर प्रकाश टाकला व आपल्या जीवनामध्ये खेळाचे महत्व विशद केले. त्याप्रमाणे प्रा.संतोष कुमार शर्मा सर यांनीसुद्धा मेजर ध्यानचंद यांच्या जीवन कार्यावर प्रकाश टाकला आणि व सर्व विद्यार्थ्यांनी खेळा कडे वळावे त्यामुळे आपण निरोगी राहू हे सगळ्यांना समजावून सांगितले. त्याच प्रमाणे प्रा. संघपाल नारनवरे सर यांनी सुध्दा आपले मनोगत व्यक्त केले. जगावर आलेल्या कोरोना या महा संकटामुळे फिजिकल डिस्टंसिंग चे पालन करून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाला महाविद्यालयातील शिक्षक तथा शिक्षकेत्तर कर्मचारी हे उपस्थित होते.