विरोधी नगरसेवकाचा सभेवर बहिष्कार.
शहरातील समस्या सोडविण्यासाठी विरोधी नगरसेवकांचा आंदोलनाचा इशारा.
Bhairav Diwase. Aug 29, 2020
कोरपना:- नगर पंचायतच्या सर्वसाधारण सभेत स्वीकृत सदस्य विजय बावणे हस्तक्षेप करीत असल्याने सभेत सविस्तर चर्चा केली जात नाही व विरोधी नगरसेवकाच्या समस्या सभागृहात समजून घेतला जात नाही, त्यामुळे आपल्या प्रभागातील समस्या कोणाकडे मांडायच्या अशा सवाल विरोधी नगरसेवकांनी मुख्याधिकारी यांची भेट घेऊन विचारना केली असून झालेल्या सभेवर विरोध दर्शवून बहिष्कार घातला आहे,
नगर पंचयातचे सर्वसाधारण सभा दि,२८ आगस्टला नवीन अभ्यासिका येथे आयोजित करण्यात आली होती, परन्तु वेळेवर व्हिडीओ कॉन्सफर्म द्वारे सर्वसाधारण सभा घेण्यात आली या सभेत विषय सूची नुसार चर्चा होणे गरजेचे आहे परंतु सभेत स्वीकृत नगरसेवक विजय बावणे नेहमीप्रमाणे मा.नगराध्यक्ष यांचा अधिकार वापरून सभेत प्रत्येक विषयात हस्तक्षेप करीत असल्याने सभेत योग्य चर्चा होऊ शकली नाही व विरोधी नगरसेवकला शहरातील विविध समस्या माडण्यापासून विरोध करून लवकरच सभा गुंडाळण्यात आली त्यामुळे विरोधी नगरसेवकांनी सर्वसाधारण सभेवर बहिष्कार घालून सभा संपल्यानंतर मा. मुख्यधिकारी यांची भेट घेऊन सभेत झालेल्या चर्चा बाबत विरोध दर्शविला आहे,
कोरपना शहरात अनेक समस्या आवसून उभ्या आहे परन्तु त्या कळे नगर पंचायत जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जाते,शहरातील विविध समस्यांबाबत अनेकदा विरोधी नागरसेवकाकडून तक्रार केली जाते परन्तु त्या तक्रारीची कोणतीही दखल घेतली जात नाही, व सर्वसाधारण सभेत सुद्धा विरोधी नगरसेवकांचा आवाज दाबला जात असतील तर शहरातील समस्या सोडविण्यासाठी रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करण्याचा इशारा नगर सेवक अमोल आसेकर, सुहेल अली, सुभाष तुराणकर, रेखा चन्ने यांनी दिला आहे,