ग्रामपंचायत, तथा आरोग्य विभाग, पोलीस स्टेशनं पाथरी यांचे आव्हान.
Bhairav Diwase. Aug 29, 2020
(संबंधित छायाचित्र)
(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) राकेश एम गोलेपल्लीवार जिबगांव, सावली
सावली:- सावली तालुक्यातील पाथरी येथे 7 कोरोना रुग्ण निघाले असून पाथरी येथील जनतेने घाबरून न जात सतर्क राहून स्वतःची काळजी घेण्याचे आव्हाहन पाथरी येथील ग्रामपंचायत कार्यालय, आरोग्य विभाग, तथा पोलीस स्टेशन यांचेकडून आव्हाहन करण्यात आले. संपूर्ण गावात ग्रामपंचायत प्रशासन वेळोवेळी सतर्क करीत असून दवंडी देत आहे. ज्यांना कुणाला सर्दी ताप खोकला व श्वसनाचा त्रास असेल त्यांनी माहिती लपवून न ठेवता आरोग्य विभागात तपासणी करण्याचे आव्हाहन आरोग्य विभागाने केले आहे. गावात अफ़वा पसरली आहे कि सर्दी, ताप खोकला असला तर प्राथमिक आरोग्य केंद्रात गेल्यास सरळ कोरोनाची तपासणी करण्यास पाठवतात. त्यामुळे प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी जाऊ नये अशी अफ़वा पसरविल्या जात आहे अशा अफवांवर नागरिकांनी विश्वास न ठेवता वैद्यकीय अधिकारी यांना लक्षण दिसल्यानंतरच कोरोनाची तपासणी केल्या जात आहे. हे आपल्यासाठी व संपूर्ण गाव परिसरासाठी हिताचे असून माहिती लपवू नये अशे आव्हाहन येथील प्रशासन करीत आहे.