Top News

चिंतामणी ग्रुप ऑफ इंस्टीट्युशन पोंभुर्णा येथे भारताचे माजी पंतप्रधान स्वर्गीय राजीवजी गांधी यांची जयंती साजरी.

Bhairav Diwase. Aug 20, 2020
(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) स्वप्निल मंडोगडे डोंगरहळदी तुकुम, पोंभुर्णा
पोंभुर्णा:- दिनांक 20 ऑगस्ट 2020 रोजी स्व. राजीव गांधी यांची जयंती सद्भावना दिवस म्हणून साजरी करण्यात आली. या कार्यक्रमाप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर सुधीर हुंगे सर तसेच महाविद्यालयाचे समाजशास्त्र विभाग प्रमुख श्री घोडेस्वार सर हे उपस्थित होते. या कार्यक्रमाप्रसंगी डॉक्टर सुधीर हुंगे सर यांनी आपल्या भाषणामध्ये माजी पंतप्रधान स्वर्गीय राजीव गांधी यांच्या कार्याला उजाळा दिला, त्याप्रमाणे भारतामध्ये माहिती-तंत्रज्ञानाचा उगम कशाप्रकारे झाला त्यांचे सर्वेसर्वा राजीव गांधी होते असे त्यांनी सांगितले. त्याप्रमाणे प्राध्यापक घोडेस्वार सर तसेच श्री राजेंद्र डोनेवार सर यांनी सुद्धा आपले मनोगत व्यक्त केले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी महाविद्यालयातील समस्त प्राध्यापक वर्ग व शिक्षकेतर कर्मचारी यांचे मोठे मोलाचे योगदान लाभले.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने