उपविभागीय पोलिस अधिकारी स्वप्नील जाधव यांना निलंबित करण्याची मागणी.

Bhairav Diwase
प्रहार जनशक्ती पक्षाचे सूरज ठाकरे यांनी गृहमंत्री यांचेकडे केली मागणी.

उपविभागीय पोलिस अधिकारी कार्यातील सीसीटिव्ही कॅमेरे बंद करून पुरावे नष्ट केल्याचा केला आरोप.

सीसीटीव्ही कॅमेरे बंद असल्याची माहिती उपविभागीय पोलिस अधिकारी कार्यालयातून माहिती अधिकारामार्फत उघड.
Bhairav Diwase. Aug 20, 2020
(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) सतीश बिडकर कोरपना
कोरपना:- पोलीस उपविभागीय अधिकारी स्वप्नील जाधव यांनी ते राजुरा येथे रुजू झाल्यापासून विविध लोकांना आपल्या दालनांमध्ये बोलावून मारहाण करीत असल्याबाबतची माहिती प्रहार जनशक्ती पक्षाचे सूरज ठाकरे यांना मिळाली. त्याचेच पुरावे म्हणून त्यांच्या दालनातील सीसीटीव्ही फुटेज ची मागणी माहिती अधिकार अधिनियम अंतर्गत केली असतात माहिती उपलब्ध नसल्यामुळे माहिती देऊ शकत नाही व अपील मध्ये जायचे असल्यास पोलिस उपविभागीय अधिकारी राजुरा यांचेकडे अपील करा असा मूर्खपणाचे पत्र व बेकायदेशीर पत्र उत्तर म्हणून पोलीस उपविभागीय अधिकारी स्वप्नील जाधव यांनी सूरज ठाकरे यांना दिले आहे. यामुळे त्यांच्यावर पब्लिक रेकॉर्ड अॅक्ट 1993 अंतर्गत कार्यवाही करावी तसेच त्यांनी स्वतः लोकांना व माझ्या सहकाऱ्यांना देखील आतापर्यंत त्यांच्या दालनांमध्ये बोलून केलेली मारहाणीचे पुरावे नष्ट केल्याचे स्पष्ट दिसून येत असल्याने त्यांचेवर त्यांच्या विरोधातील पुरावे नष्ट केल्या बाबत देखील विविध कलमांतर्गत कार्यवाही करावी अशी मागणी सूरज ठाकरे यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांचेकडे केली आहे आणि कारवाई न झाल्यास उच्च न्यायालयात दाद मागणार असल्याचे सूरज ठाकरे यांनी सांगितले.