Top News

चिंतामणी कॉलेज ऑफ सायन्स पोंभुर्णा वाचन प्रेरणा दिन साजरा.

Bhairav Diwase. Oct 15, 2020


(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) स्वप्निल मंडोगडे डोंगरहळदी तुकुम, पोंभुर्णा
पोंभुर्णा:- चिंतामणी कॉलेज ऑफ सायन्स पोंभुर्णा, येथे भारताचे माजी राष्ट्रपती तथा भारतरत्न डॉक्टर ए.पी.जे. अब्दुल कलाम यांची जयंती 15 ऑक्टोबर 2020 रोजी महाविद्यालयामध्ये वाचन प्रेरणा दिवस म्हणून साजरी करण्यात आली. या आभासी कार्यक्रमासाठी पाहुणे म्हणून डॉक्टर संजय साबळे सर ग्रंथालय विभाग प्रमुख आनंद निकेतन कॉलेज ऑफ आर्ट अँड सायन्स वरोरा, जिल्हा चंद्रपूर हे उपस्थित होते.

कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर सुधीर हुंगे सर उपस्थित होते. त्याच प्रमाणे महाविद्यालयाचे ग्रंथपाल प्राध्यापक सतीश पिसे उपस्थित होते. विद्यार्थ्यांना संबोधित करताना डॉक्टर साबळे सरांनी प्राचीन काळापासून तर आजच्या वर्तमान काळातील तंत्रज्ञानावर आधारित वाचन संस्कृतीवर प्रकाश टाकला व वाचनाचे महत्त्व विशद केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉक्टर हुंगे सर यांनीसुद्धा वाचन प्रेरणा दिवसाचे महत्त्व समजावून सांगितले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राध्यापक सतीश पिसे यांनी केले तर कार्यक्रमाचे आभार प्राध्यापक अमोल गर्गेलवार यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व प्राध्यापक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांचे मोलाचे योगदान लाभले.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने